राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न

मुर्तिजापूर

शहर व ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन येथील शासकीय

विश्राम गृह येथे दि.१९ जून रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात आले होते.

Related News

या आढावा बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक आमदार अमोल मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मो.बदरुज्जमा हे होते.

आढावा बैठकीमध्ये आगामी काळामध्ये होत असलेल्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबात व पक्ष

संघटन बांधणी या विषयावर आढावा बैठक घेण्यात आली व आमदार अमोल मिटकरी व जिल्हाध्यक्ष

मो.बदरुज्जमा यांच्या मार्गदर्शनात अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी पक्षप्रवेश केला.

यावेळी राकॉपा महिला प्रदेश पदाधिकारी उज्वला राऊत,प्रतिभा अवचार,संध्या वाघोडे,डॉ.विशाल इंगोले,

अजय गावंडे,सोनू गुडदे,रुपाली वाकोडे,हरी वाघोडे,जगदीश मारोटकर,सरवर बेग,सिद्धार्थ तायडे,

अमोल लोकरे,किशोर सोनोने,डॉ.चाऊस,शारदा सिरसाठ,सुनंदा नवघरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Also : https://ajinkyabharat.com/akolidya-poonha-khabnabhiya-murdan-dagad-to-darun-darcha-kawa-qaeda-suvidyavasthare-questions/

Related News