अकोल्यात पुन्हा खळबळजनक हत्या! दगडाने ठेचून व्यक्तीचा खून; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

🔴 अकोल्यात पुन्हा खळबळजनक हत्या! दगडाने ठेचून व्यक्तीचा खून; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

अकोला प्रतिनिधी | २१ जून २०२५

अकोल्यात पुन्हा एकदा हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जुन्या पैशाच्या वादातून प्रकाश जोसेफ या व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला असून,

Related News

आरोपी पवन मोरे याला अटक करण्यात आली आहे.

ही घटना जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रमाबाई आंबेडकर नगरात घडली आहे.

आरोपीने मृतकाच्या डोक्यात दगड घालून ठार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीवरून जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अकोल्यात सतत वाढत चाललेल्या गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमुळे पोलिसांच्या कामगिरीवर

प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्थेच्या ढासळलेल्या स्थितीची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.

 पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर (जुने शहर पोलीस ठाणे, अकोला)

यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/jalat-yoga-akolid-water-yogane-sajra-jhala-11th-international-yoga-day/

Related News