शेगाव तालुक्यासह जिल्हा मध्ये शोकाकळा शहिदाला दिली मानवंदना

शेगाव तालुक्यासह जिल्हा मध्ये शोकाकळा शहिदाला दिली मानवंदना

शेगाव प्रतिनिधी

शेगाव तालुक्यातील भुई हिंगणा या गावातील जवानाला झारखंडमध्ये वीरगती प्राप्त झाली.

भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची स्वप्न उराशी बाळगून झारखंडमध्ये कर्तव्य

Related News

बजावत असणाऱ्या शेगाव तालुक्यातील घुई येथील बीएसएफ जवान भीमराव विलास भोजने

यांना १६ जून रोजी झारखंड येथे वीरगती प्राप्त झाली. प्रचंड मेहनत घेऊन घुई येथील जवान भीमराव भोजने हे

बी एस एफ दलात भरती झाले होते.

दरम्यान १६ जून रोजी त्यांना वीरगती प्राप्त झाल्याने त्याचे पार्थिव विमानाने नागपूर येथे आणण्यात आले.

आज बुधवार रोजी शेगाव तेथील जगदंबा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

चौक तसेच तीन पुतळा या मार्गे ठिकठिकाणी मानवंदना देण्यात आली तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांनी

त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकच गर्दी केली होती शेगाव शहरासह घुई गावामध्ये ठिकठिकाणी रांगोळ्या

काढून शहीद जवान अमर रहे अशा गगनभेदी आवाजात शेगाव शहरातून त्यांचे पार्थिव पोलीस बंदोबस्तात भुई या

ठिकाणी नेण्यात आले नंतर त्यांचे राहते घर घुई ता. शेगाव येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

पार पडले यावेळी शासकीय अधिकाऱ्यासह समता सैनिक दलाच्या जवानांनी सुद्धा शहीद भीमराव विलास

भोजने यांना मानवंदना अर्पण केली तसेच शेगावातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सुद्धा शहीद भीमराव भजने यांना मानवंदना दिली.

Read Also :https://ajinkyabharat.com/pramod-vaghurde-yanchi-bjp-sahakar-morcha-taluka-president-appointment/

Related News