महाराष्ट्र शासन दरबारी श्रींच्या पालखी सोहळ्याची विशेष दखल

महाराष्ट्र शासन दरबारी श्रींच्या पालखी सोहळ्याची विशेष दखल

आकोट तालुका प्रतिनिधी

श्री क्षेत्र पंढरपूर वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्र तथा इतर राज्यांमधून येणाऱ्या विविध पालख्यांसाठी महाराष्ट्र शासनाने सेवा

सुविधा पुरवण्याबाबत आराखडा नियोजित केला आहे. विदर्भामध्ये तीन पालख्यांबाबत शासनाने निर्देश देऊन सेवेची आखणी केली आहे.

Related News

यामध्ये विदर्भकन्या श्री रुक्मिणी देवी पालखी सोहळा श्रीक्षेत्र कौंडण्यपूर,श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा,

शेगाव आणि श्री संत वासुदेव महाराज पालखी सोहळा,श्री क्षेत्र श्रद्धासागर,आकोट या ३ पालख्यांचा यामध्ये समावेश आहे.

जिल्हा प्रशासन स्वतः जातीने लक्ष घालून या तीनही पालखी सोहळ्यांना विविध सेवा देत आहेत.

कोरोना काळातसुद्धा सलग दोन वर्ष सद्गुरु श्री संत वासुदेव महाराज यांच्या पादुकांना महाराष्ट्र शासनाच्या विशेष

सेवा सुविधेमध्ये श्री क्षेत्र पंढरपूर वारी करिता श्री रुक्मिणी माता पालखी सोहळ्यामध्ये बहुमान देण्यात आला होता.

त्यावेळी सद्गुरु श्री संत वासुदेव महाराज आणि भगवान श्री पंढरीनाथ यांच्या कोरोना काळातील भेटीचा प्रसंग आजही वर्णिल्या जात आहे.

तोच बहुमान कायम ठेवीत श्री संत वासुदेव महाराज पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे शासकीय,

प्रशासकीय,वैद्यकीय व पोलीस प्रशासनाकडून विविध सेवा दिल्या जात असून वारकऱ्यांच्या सेवेत ॲम्बुलन्स पालखी सोहळ्यामध्ये आहे.

ही माहिती पालखी सोहळ्यामधील शासकीय यंत्रणेच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी श्री ह भ प वासुदेवराव महाराज महल्ले यांनी

देताच वारकरी भाविकांनी टाळ्यांचा कडकडाट करून महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री द्वय तथा सर्व शासन,

प्रशासन यंत्रणेचे कौतुक केले आहे. श्री संत वासुदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा वाशिम जिल्ह्याच्या हद्दीमध्ये प्रवेश होताच

जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे आढावा घेण्यात आला. शासन निर्देशानुसार नायब तहसीलदार सुनील देशमुख,

मालेगाव यांनी पालखी सोहळ्यामध्ये येऊन दिंडी व्यवस्थापनाबाबत चर्चा केली.तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या वैद्यकीय सेवेच्या टीमने

सर्व वारकऱ्यांची तपासणी करून औषधांचे वितरण केले.नायब तहसीलदार कैलास देवळे,वाशिम यांनी सकाळी भेट व चर्चा करून

वाशिम जिल्ह्यातील मुक्कामांचे ठिकाणी शासनाकडून अपेक्षित व्यवस्थेबाबत माहिती घेतली. समाधान राठोड,

तहसीलदार वाशिम यांनी पालखी सोहळ्यामध्ये असलेल्या सर्व बाबींचे निरीक्षण करीत काही वेळ पायदळ वारीसुद्धा केली.

महाराष्ट्रामध्ये निवडक पालखी सोहळ्यांच्या बाबत महाराष्ट्र शासनाने जाणीवपूर्वक दखल घेऊन आवश्यक ती सुविधा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत.

त्यानुसार स्थानिक प्रशासकीय यंत्रणा वारकरी भाविकांच्या सेवेत सज्ज झाली आहे. यांसोबतच आरोग्य विभाग यांच्याकडून

ॲम्बुलन्स सेवा,त्याचप्रमाणे जिल्हा आरोग्य अधिकारी पांडुरंग ठोंबरे यांच्या चमुनेव वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभांगी वैष्णव,

आरोग्य सेवक संदीप नप्ते, नितीन व्यवहारे, विजय गोटे यांचेकडून वैद्यकीय सेवा सुद्धा तत्परतेने आणि आस्थेने दिल्या जात आहे.

दरम्यान अकस्मात एका वारकरी महिलेची प्रकृती अत्यावस्था झाली होती. शासकीय व वैद्यकीय यंत्रणेने तिची तात्काळ प्राथमिक सुश्रुषा

करून तिला वाशिम येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.सद्यस्थितीत तीची प्रकृती स्थिर आहे.

या आरोग्य सेवेबाबत वारकरी भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.वाशिम पोलीस ग्रामीण विभागाचे पोलीस इन्स्पेक्टर श्रीमती

श्रीदेवी पोकळी यांनी पोलीस प्रशासनातर्फे सुरक्षेबाबत आवश्यक ती सर्व सेवा दिली.यावेळी संस्थाध्यक्ष

श्री वासुदेवराव महल्ले यांनी गुरुवर्य श्री संत वासुदेवजी महाराज यांच्या जीवन कार्यावर माहिती दिल्यानंतर सर्व अधिकारी

मंडळी अत्यंत प्रभावीत झाली.श्री संस्थेकडून सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार सोहळा संपन्न झाला.

Read Also : https://ajinkyabharat.com/shiv-sena-upazilhapramukh-dilip-boche-yanchaya-pudhakarane-meetanar-gharul-holder-question/

Related News