बार्शिटाकळी पोलीस ठाणे हद्दीतील काजळेश्वर येथील जयचंद रमेश जाधव (वय 30, व्यवसाय शेती)
यांच्या मालकीच्या दोन गायी चोरीस गेल्याची घटना नुकतीच घडली. जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,
एक पांढऱ्या रंगाची (वय 4 वर्ष, किंमत ₹12,000) आणि एक लाल रंगाची गाय
Related News
नायब तहसीलदारांनी शेतातच भरवले न्यायालय; शेतकऱ्याला दिलासा
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
(वय 6 वर्ष, किंमत ₹17,000) असा एकूण ₹29,000 किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता.
या प्रकरणी IPC कलम 303 (2) अन्वये 25 मे 2025 रोजी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
तपासाची दिशा आणि अटक:
गुन्हा उघडकीस आणण्यासाठी ठाणेदार दिपक वारे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष शोध पथक तयार करण्यात आले.
या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत असताना, तिवसा येथील
महादेव गजानन कळम याने सदर जनावरं चोरी केल्याची माहिती मिळाली.
त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, चोरी केलेली गाय बार्शिटाकळी येथील
इरशाद उल्ला खा उर्फ ‘गुड्डू’ यास विकल्याचे त्याने कबूल केले.
यावरून पोलिसांनी इरशाद खालाही शिताफीने अटक केली.
त्याच्या राहत्या घरातून फिर्यादीच्या मालकीची ₹17,000 किंमतीची पांढरी गाय जप्त करण्यात आली.
तसेच गुन्ह्यात वापरलेले ₹2,50,000 किंमतीचे वाहन (MH 30 BD 6746) देखील जप्त करण्यात आले.
एकूण ₹2,67,000 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
उर्वरित आरोपींचा तपास सुरू
या गुन्ह्यात इतर 3 आरोपींची नावे देखील निष्पन्न झाली असून, त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे,
तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार दिपक वारे,
ASI फराज शेख, पोहवा विजय शेगोकर, नागसेन वानखडे, राजू जौंधरकर,
पाशि मनिष घुगे, ईश्वर पातोंड, संतोष दाभाडे आदींनी केली.
पुढील तपास
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा विजय शेगोकर करत आहेत.