पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;

पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;

पाटणा (बिहार): पाटणा-जयनगर दरम्यान ‘नमो भारत’ (वंदे मेट्रो) ट्रेन सुरू झाल्यानंतर

आता बिहारमधील दुसऱ्या मार्गावरही ही हायटेक वातानुकूलित ट्रेन धावण्याची शक्यता आहे.

पाटणा ते गयाजी किंवा बक्सर दरम्यान ‘नमो भारत’ ट्रेन चालवण्याचा विचार रेल्वे करत आहे.

Related News

सध्या ही ट्रेन सकाळी 10 वाजता पाटणाला पोहोचते आणि संध्याकाळी 6 वाजता जयनगरसाठी रवाना होते.

या दरम्यान सुमारे 8 तास ट्रेनचा रॅक पाटणा स्थानकावर रिकामा उभा असतो.

याच वेळेचा दुसऱ्या मार्गासाठी उपयोग करून प्रवाशांना सुविधा देण्याची मागणी वाढली आहे.

फिजिबिलिटी अहवालावर आधारित निर्णय

दानापूर रेल्वे विभागाचे एडीआरएम आधार राज यांनी सांगितले की, गयाजी आणि बक्सर या

दोन्ही मार्गांची व्यवहार्यता (फिजिबिलिटी) तपासली जाणार आहे.

ज्या मार्गावर सेवा देणे अधिक सोयीचे ठरेल, तिथे ‘नमो भारत’ ट्रेन धावेल.


सध्या पाटणा-जयनगर दरम्यान धावणाऱ्या ‘नमो भारत’ ट्रेनचे तिकीट ८५ ते ३४० रुपये दरम्यान आहे.

ही ट्रेन आठवड्यातील सहा दिवस चालते आणि पूर्णपणे वातानुकूलित आहे.

ही शॉर्ट डिस्टन्स प्रवासासाठी खास डिझाइन करण्यात आलेली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/englandcha-ransangram-pahilyach-divashi-498-dhawa/

Related News