“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;

"आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;

मुंबई (प्रतिनिधी): “बडे बाप का बेटा” असला तरी तुरुंगात सगळ्यांना सारखंच वागवलं जातं,

असं सूचित करत खासदार संजय राऊत यांनी शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानच्या

तुरुंगातील वास्तवाचे अनुभव आपल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात मांडले आहेत.

Related News

पत्राचाळ प्रकरणात अटकेनंतर संजय राऊत जवळपास १०० दिवस आर्थर रोड तुरुंगात होते.

याच काळात ड्रग्ज प्रकरणात अटक झालेला आर्यन खान देखील तिथेच होता.

दोघांचा मुक्काम ‘दहा नंबर यार्ड’ मध्ये होता.

आर्यन खानचा तुरुंगातील दिनक्रम

संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, “आर्यन तुरुंगात फारसं काही खात नसे.

तो फक्त फळं आणि पाण्यावर राहायचा. कोणाशीही फारसा बोलायचा नाही.”

एकदा त्याच यार्डातील सहाय्यकाने ब्रँडेड टी-शर्ट घातलेला पाहून राऊतांनी विचारलं,

त्यावर तो म्हणाला, “आर्यन खान जाताना मला हा टी-शर्ट दिला.”

‘अटका प्रसिद्धीच्या हव्यासापोटी’ — राऊतांचा आरोप

राऊत यांनी स्पष्ट केलं की, तपासात आर्यनकडे कोणतेही अमली पदार्थ आढळले नव्हते,

आणि त्याने ड्रग्स घेतल्याचेही काही पुरावे नव्हते. “पैसा आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ही अटक झाली,”

असा थेट आरोप त्यांनी पुस्तकात केला आहे.

जेलमधील पैसेखोरीचा पर्दाफाश

राऊत यांनी आणखी एक खुलासा करत सांगितलं की, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा

यालाही तुरुंगात सवलती मिळाव्यात म्हणून फोन आणि पैशांच्या ऑफर्स आल्या होत्या. पण जेल प्रशासनाने त्याला जनरल यार्डातच ठेवले.

“जेल पैशावरच चालते आणि चालवली जाते, यावर माझी श्रद्धा आहे,” असं त्यांनी पुस्तकात स्पष्टपणे नमूद केलं आहे.

या पुस्तकातील खुलास्यांमुळे सेलिब्रिटींच्या तुरुंगातील जगण्याचे वास्तव समोर येत असून,

सामान्य कैद्यांसारखीच वागणूक त्यांनाही दिली गेल्याचे स्पष्ट होत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akot-municipal-area/

Related News