पाकिस्तानसाठी काम करत होते, ज्योती मल्होत्राची मोठी कबुली;

पाकिस्तानसाठी काम करत होते, ज्योती मल्होत्राची मोठी कबुली;

हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिने आपल्या कबुली जबाबात पाकिस्तानच्या

सूचनेनुसार काम केल्याचं मान्य केलं आहे.

देशविरोधी कारवायांमध्ये तिचा थेट सहभाग होता, अशी धक्कादायक माहिती तिच्या जबाबातून समोर आली आहे.

Related News

ज्योतीची कबुली – काय म्हटलं तिने?

तपास यंत्रणांना दिलेल्या जबाबात ज्योती म्हणाली की,

“मी पाकिस्तानात शकीर आणि राणा शाहबाज यांना भेटले होते.

शकीरचा नंबर मी ‘जट रंधावा’ नावाने माझ्या फोनमध्ये सेव्ह केला होता. पाकिस्तानातून मिळालेल्या सूचनांनुसार मी काम करत होते.”

इतकंच नव्हे तर, ज्योतीने देशविरोधी माहितीची देवाण-घेवाण केल्याची कबुलीही दिली आहे.

दानिशशी दिल्लीमध्ये संपर्क

तिने 2023 मध्ये पाकिस्तानचा व्हिसा मिळवण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात भेट दिली होती.

“तेथे माझी ओळख दानिश नावाच्या व्यक्तीशी झाली. त्याचा मोबाईल

नंबर घेऊन मी त्याच्याशी संवाद सुरू केला. त्यानंतर मी दोन वेळा पाकिस्तानला गेले.”

हसनने केली व्यवस्था

तिने पुढे सांगितले की,

“पाकिस्तानात माझी भेट हसन नावाच्या व्यक्तीशी झाली, ज्याने माझ्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती.”

देशविरोधी कारवायांचा तपास गतीमान

ज्योतीच्या जबाबामुळे देशविरोधी नेटवर्कचा आणखी मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

गुप्तचर यंत्रणा, पोलीस आणि केंद्रीय एजन्स्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/sonechya-darat-punha-vadha/

Related News