अकोल्यात १६ किलो गांजासह तिघांना अटक — साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोल्यात १६ किलो गांजासह तिघांना अटक — साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोल्यातील रामदासपेठ परिसरातून 16 किलो गांजासह तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पोलिसांनी साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अकोला स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून, काहीजण गांजा विक्रीसाठी रेल्वे स्टेशनमार्गे मनपा

Related News

सेमी-इंग्रजी शाळा क्र. 7 समोरील पाण्याच्या टाकीजवळून जाणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार, पोलिसांनी त्या ठिकाणी नाकाबंदी केली. यावेळी बादल लाला कांबळे,

सुनील द्वारका प्रसाद यादव आणि रोशन भास्कर सोनोने या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याजवळील बॅगांची तपासणी केली असता, त्यामध्ये एकूण 16 किलो गांजा आढळून आला.

या अमली पदार्थाची अंदाजे किंमत 3 लक्ष 20 हजार असून, तिघांकडून तीन मोबाइल फोनही जप्त करण्यात आले.

एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे साडेतीन लक्ष रुपये आहे.

या प्रकरणी तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Read Also :  https://ajinkyabharat.com/operation-sindurala-zagatik-patheim-mivanyasathi-bharti-international-moheem-%e0%a5%ad-khasdracharane-shishtamand-pardenda-honar-honar/

 

Related News