अकोल्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी;

अकोल्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी;

अकोला | अकोला शहरात आज सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यांसह पावसाने जोरदार हजेरी लावली.

४० अंशांवर गेलेला तापमान अचानक घसरल्याने वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे.

आज दुपारनंतर अचानक वातावरणात मोठा बदल झाला. याआधी जिल्ह्यातील

Related News

मूर्तिजापूरअकोट तालुक्यांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली होती.

त्यानंतर आता अकोला शहरालाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

हवामान विभागाने आधीच दिला होता पावसाचा इशारा

हवामान खात्याने अकोला जिल्ह्यासाठी आज पावसाचा अलर्ट जारी केला होता आणि तो अचूक ठरला.

जिल्ह्यात अनेक भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन काही काळ विस्कळीत झालं.

शेतकरी वर्गात चिंता वाढली

अचानक आलेल्या पावसामुळे कांदा, फळबागा तसेच इतर उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची

भीती निर्माण झाली आहे. जोरदार वाऱ्यांमुळे फळं झाडावरून खाली पडण्याचे

प्रमाणही वाढल्याचं स्थानिक शेतकरी सांगत आहेत.

काही भागांमध्ये शेतीचे नुकसान झाल्याच्या प्राथमिक तक्रारीही मिळाल्या आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/thane-kalyanmadhyay-ghar-khedardidhanasathi-suvarnasandhi/

Related News