शोपियांमध्ये ‘ऑपरेशन केलर’ दरम्यान मोठी कारवाई;

शोपियांमध्ये ‘ऑपरेशन केलर’ दरम्यान मोठी कारवाई;

शोपियां (जम्मू-काश्मीर) – १३ मे २०२५ रोजी शोपियां जिल्ह्यातील शुकरू केलर भागात सुरक्षा दलांनी

‘ऑपरेशन केलर’ अंतर्गत मोठी कामगिरी करत लष्कर-ए-तोयबा (LeT) व त्याच्याशी संलग्न असलेल्या द

रेसिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनांचे तीन दहशतवादी ठार केले.

Related News

ठार झालेल्यांमध्ये TRF चा टॉप कमांडर शाहिद कुट्टे याचा समावेश आहे.

ही कारवाई अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली. मुठभेडीदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा

दलांवर जोरदार गोळीबार केला, मात्र जवानांनी प्रभावी प्रत्युत्तर देत तिघांनाही ठार केलं.

विशेष बाब म्हणजे या कारवाईत एकाही नागरिक वा जवानाचा बळी गेलेला नाही.

सुरक्षा दलांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला आहे. यामध्ये AK-47 रायफल्स,

पिस्तूल, ग्रेनेड्स आणि इतर युद्धसामग्रीचा समावेश आहे. या शस्त्रसाठ्यामुळे दहशतवाद्यांची मोठी कटकारस्थानं उधळून लावल्याचं मानलं जातं आहे.

विशेष म्हणजे ही मुठभेढ काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये झालेल्या भयंकर हल्ल्यानंतरच घडली.

त्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, शोपियांमध्ये ठार

झालेल्या दहशतवाद्यांचा संबंध पहलगाम हल्ल्याशी असल्याचा संशय आहे.

‘ऑपरेशन केलर’ ही दहशतवादाविरोधातील लढाईत एक मोठी कामगिरी ठरली आहे.

यामुळे काश्मीर खोऱ्यातील शांततेच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/aklychaya-patur-rhodwar-is-a-fierce-flawless/

Related News