पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड

पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड

नवी दिल्ली | १३ मे २०२५

“ऑपरेशन सिंदूर”द्वारे पाकिस्तान आणि तिथे आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांना जोरदार चपराक दिल्यानंतर

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसला भेट दिली.

Related News

ही तीच जागा आहे जिथे पाकिस्तानने खोटा दावा करत म्हटले होते की,

त्यांनी भारताच्या सैन्य तळांवर हल्ला करून S-400 प्रणाली उद्ध्वस्त केली आहे.

🇮🇳 जवानांमध्ये उत्साह, “भारत माता की जय” चा निनाद

एअरबेसवर पोहोचताच पंतप्रधान मोदींनी जवानांशी संवाद साधला.

त्यावेळी परिसरात “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” चे घोष जोरात ऐकू येत होते.

जवानांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि उत्साह स्पष्ट दिसत होता.

पंतप्रधान मोदींनी भेटीनंतर सोशल मीडियावर लिहिलं,

“आज सकाळी मी आदमपूर एअरफोर्स स्टेशनला गेलो आणि आपल्या शूर वीर जवानांना भेटलो.

त्यांचं साहस, निर्धार आणि निडरता अनुभवणं ही अत्यंत विशेष गोष्ट होती.

देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आपल्या सशस्त्र दलांचे आपण नेहमीच ऋणी राहू.”

पाकिस्तानचा खोटेपणा उघड

पाकिस्तानने 9-10 मे रोजी आदमपूर आणि सिरसा एअरबेसवर JF-17 फायटर जेटमधून हायपरसोनिक

क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला होता. मात्र, भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने हा हल्ला निष्फळ ठरवला.

विदेश सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत हे दावे खोटे असल्याचे स्पष्ट केले आणि आदमपूर तसेच

सिरसा एअरबेसच्या सध्याच्या स्थितीचे फोटो दाखवले – जेथे कोणतेही नुकसान झालेले नव्हते.

 मोदींच्या भेटीने खोटे दावे झाले निष्प्रभ

पंतप्रधान मोदींच्या प्रत्यक्ष भेटीने पाकिस्तानचा प्रचार पूर्णतः निष्प्रभ ठरवला आहे.

एकीकडे भारताने “ऑपरेशन सिंदूर”मधून जबरदस्त कारवाई केली,

तर दुसरीकडे पाकिस्तानच्या खोट्या गोष्टींना आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडघशी पाडलं.

Read Also : https://ajinkyabharat.com/cbse-barawi-removes-zaheer/

Related News