ड्रोन हल्ल्यांमुळे PSL स्थगित; बांगलादेशी खेळाडूचा पाकिस्तान क्रिकेटवर गंभीर आरोप

पाकिस्तान क्रिकेट में मचा हंगामा, PSL के विदेशी खिलाड़ी ने पोल खोलकर रख दी, ड्रोन हमले से लेकर धोखेबाजी तक...सब कुछ

इस्लामाबाद | १३ मे :

भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमध्ये विविध ठिकाणी झालेल्या कारवायांमुळे

पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर हानी सहन करावी लागली. याच कारवाईदरम्यान रावळपिंडी येथील लष्करी

Related News

मुख्यालयासह क्रिकेट स्टेडियमवरही ड्रोन हल्ले करण्यात आले.

या हल्ल्यांमुळे पाकिस्तान सुपर लीग (PSL) तात्काळ स्थगित करण्यात आली

आणि नंतर स्पर्धा युएईत हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

या पार्श्वभूमीवर PSL 2025 मध्ये सहभागी असलेल्या बांगलादेशच्या क्रिकेटपटू रिशाद होसैन

यांनी एक खळबळजनक खुलासा करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) गंभीर आरोप केले आहेत.

“ड्रोन हल्ले सुरू असताना आम्हाला कराचीत खेळत राहण्यास भाग पाडले जात होते,” असे त्यांनी म्हटले.

रिशादच्या म्हणण्यानुसार, PCB अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी PSL खेळणाऱ्या देश-विदेशातील खेळाडूंना

प्रत्यक्ष स्थितीबाबत काहीही माहिती दिली नव्हती. ड्रोन हल्ल्यांमुळे अनेक खेळाडू भयभीत झाले होते

आणि आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत चिंतेत होते. खेळाडूंनी विरोध करताच स्पर्धा युएईत हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

“पाकिस्तानमध्ये राहून खेळणे सुरक्षित नाही, हे सर्वांना जाणवले होते.

आम्ही तातडीने देश सोडण्याचा निर्णय घेतला,” असेही रिशादने स्पष्ट केले.

Read Also : https://ajinkyabharat.com/bharatchaya-action-pakistanchaya-fighter-jetla-damage/

Related News