शेलुबाजार वार्ता दि.११
वैशाख पौर्णिमेच्या चांदण्यात जंगल शांत आणि सुंदर दिसत असते. याच शांत वातावरणात वन्य
प्राण्यांना अगदी जवळून पाहण्याचा अनुभव खूप खास असतो. काटेपूर्णा अभयारण्यात आज १२ मे,
Related News
चूकूनही करू नका ही एक चूक
‘याचना नाही आता रण होईल’
विराट कोहलीचा टेस्ट क्रिकेटमधून संन्यास
चंद्रपूरमध्ये वाघाची दहशत – ७२ तासांत ५ महिलांचा मृत्यू
“पहलगामपर्यंत पापाचा घडा भरला होता…
नीट ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं अकोल्यातील अशोक वाटिकेत प्रार्थनांचं आयोजन
बुद्ध पौर्णिमा निमित्त महाबोधी वृक्षाचे १२ तास महापूजा
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून सुरू
विराट कोहलीची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती;
ड्रोन हल्ल्यांमुळे PSL स्थगित; बांगलादेशी खेळाडूचा पाकिस्तान क्रिकेटवर गंभीर आरोप
भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या फायटर जेटला नुकसान
सोमवार रोजी पौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना होणार आहे. यामुळे निसर्गप्रेमी
आणि वन्यजीव प्रेमींना वन्यप्राण्यांना जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.
अकोला वन्यजीव विभागाच्या अंतर्गत असलेल्या वाशिम आणि अकोला जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या काटेपूर्णा
अभयारण्यात प्राणीप्रेमींसाठी मचाणांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या मचाणांवर बसून निसर्ग आणि प्राणी प्रेमींना वैशाख पौर्णिमेच्या शुभ्र चांदण्यात विविध प्राणी पाहता येणार आहेत.
त्याच वेळी, वन्यप्रेमी वन्यप्राणी आणि पक्ष्यांची नोंद घेणार आहेत.
त्यामुळे, दरवर्षी वैशाख पौर्णिमेला वन विभागाकडून ‘निसर्ग अनुभव मचान गणना’ हा उपक्रम आयोजित केला जातो.
सुमारे ६५०० हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या काटेपूर्णा अभयारण्याच्या उत्तरेकडील भागात नैसर्गिक जलाशय आहे,
तर दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील वनपरिक्षेत्रात नैसर्गिक जलस्त्रोतांची कमतरता आहे.
त्यामुळे वन विभागाने विविध ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत.
याच पाणवठ्यांच्या आसपास विशिष्ट उंचीवर लाकडी मचाण तयार करण्यात आले आहेत.
या मचाणांवर बसून वन्यप्रेमी आणि निसर्गप्रेमींना आज या रात्रीच्या निसर्गाचा अनुभव घेता येणार आहे.
बॉक्स
अभयारण्यात आल्यावर एका मचनावर एक किंवा दोन निसर्गप्रेमींची व्यवस्था करण्यात आली आहे
या मचनावर निसर्गप्रेमींन बरोबर वन विभागाचे कर्मचारी किंवा स्वयंसेवी संस्थांची मार्गदर्शक असणार आहेत
नोंदणी झालेल्या निसर्ग व वन्यप्रेमींना सकाळी दहा वाजता अभयारण्यात प्रवेश देण्यात येणार आहे
त्यानंतर दुपारी दोन वाजता त्यांना मचाणावर नेण्यात येईल बातमी संकलन – श्याम अपूर्वा शेलुबाजार.
पवन जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी काटेपूर्णा-सोहळ अभयारण्य
Read Also : https://ajinkyabharat.com/akot-talukyathi-vadi-vyasah-pavasamue-moth-disadvantage/