नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अधिकच तीव्र झालेला असताना,
केंद्र सरकारने दहशतवादाविरुद्ध एक कठोर आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापुढे भारताविरुद्ध करण्यात
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
येणारी कोणतीही दहशतवादी कारवाई ‘युद्ध’ म्हणून मानली जाईल.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून भारतात २६ ठिकाणी दहशतवादी
कारवाया करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ही ठोस भूमिका घेतली आहे.
दहशतवाद म्हणजेच युद्ध
सरकारच्या नव्या भूमिकेनुसार, पाकिस्तानकडून प्रायोजित कोणतीही दहशतवादी घटना थेट युद्ध मानली जाईल
आणि त्याला सैनिकी उत्तर दिलं जाईल. यामुळे भारताची सुरक्षा नीती अधिक आक्रमक आणि परिणामकारक होणार असल्याचं मानलं जात आहे.
या निर्णयामुळे, पाकिस्तानला ‘नॉन-स्टेट अॅक्टर्स’च्या आड लपता येणार नाही,
आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला बळकटी मिळण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारचा हा निर्णय भारताच्या ‘झीरो टॉलरन्स टू टेररिझम’ धोरणाला अधिक ठोसपणे अधोरेखित करणारा आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/undergrained-bahujan-young-man-aghadichya-vati-donation-shibir/