ओवैसींचा पाकिस्तानवर घणाघात; ‘हुकूमत तर सोडा

ओवैसींचा पाकिस्तानवर घणाघात; 'हुकूमत तर सोडा

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधी संताप उसळला असताना,

AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर थेट आणि परखड हल्लाबोल केला आहे.

भारतातील २३ कोटी मुस्लिमांनी जिन्नांच्या ‘टू नेशन थिअरी’ला नाकारलं आणि भारतातच राहणं पसंत केलं, हे पाकिस्तानने विसरू नये, असा इशारा त्यांनी दिला.

Related News

पाकिस्तानने भारताला अस्थिर करण्याचा डाव टाकला असून, धर्माच्या नावावर देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला जात आहे,

असा आरोप ओवैसी यांनी केला. ते म्हणाले की, “आम्ही भारतात राहूनच लढू, देशाच्या सुरक्षेसाठी उभं राहू.

पाकिस्तानने अफगाणिस्तान आणि इराण सीमेवर केलेली कारवाई त्यांचा खरा चेहरा उघड करते.”

पाकिस्तानच्या परमाणु शस्त्रास्त्रांवर ओवैसींची चिंता

“पाकिस्तानकडून श्रीनगरमध्ये ड्रोन पाठवले जात आहेत, नागरिकांवर हल्ले होत आहेत.

या देशाच्या अण्वस्त्रांचा धोका संपूर्ण जगासाठी आहे. त्यामुळे त्यांचे शस्त्र निःशस्त्रीकरण आवश्यक आहे,”

असं मत ओवैसी यांनी व्यक्त केलं. ते पुढे म्हणाले, “आम्ही युद्ध नको म्हणतो, पण कोणी लढाई लादलीच, तर आम्ही मागे हटणार नाही.”

आर्थिक डबघाईवरूनही टीका

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची खिल्ली उडवत ओवैसी म्हणाले, “पाकिस्तान IMF कडून १ अब्ज डॉलरचं कर्ज मागतो आणि ते

अधिकृत भीक मागण्यासारखं आहे. IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी नव्हे, तर आंतरराष्ट्रीय दहशतवादी निधी वाटतो.”

भारतावरील हल्ल्यांवर कठोर शब्दात निषेध

“पाकिस्तानने नागरिक भागांवर हल्ले करून अनेक निष्पापांचा जीव घेतला. जम्मूतील रुग्णालयांवर बॉम्बहल्ला,

गुरुद्वाऱ्याचं नुकसान, मस्जिदीतील इमामाची हत्या – हे सर्व त्यांचे नियोजित कृत्य आहेत.

ते कायमच धार्मिक मुखवटा घालून भारतात गोंधळ घालतात,” असं ओवैसी म्हणाले.

‘बुनियान-अल-मरसूस’च्या चुकीच्या वापरावर टीका

पाकिस्तानच्या ‘बुनियान-अल-मरसूस’ या मोहिमेच्या नावावर टीका करताना ओवैसी म्हणाले,

“कुराणातील ही आयत एकतेचा संदेश देते, पण पाकिस्तानने तिचा चुकीचा वापर करून धर्माचा अपमानच केला आहे.

जेव्हा त्यांनी पूर्व पाकिस्तानात बंगाली मुसलमानांवर गोळीबार केला, तेव्हा कुठे होती त्यांची ‘ठोस भिंतीसारखी उभी’ भूमिका?”

Read Also : https://ajinkyabharat.com/bharatacha-pahila-hydrogen-fuel-cell-truck-adani-interprayjeskadun-launch/

Related News