राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव कडक निर्णय

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग कंटेंटवर केंद्र सरकारचा बंदी आदेश; राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव कडक निर्णय

नवी दिल्ली | ८ मे २०२५ — केंद्र सरकारने भारतात कार्यरत सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स, डिजिटल

स्ट्रीमिंग सेवा आणि मध्यस्थ माध्यमांना पाकिस्ताननिर्मित सर्व प्रकारच्या डिजिटल कंटेंटवर

(वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट) तात्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

Related News

ही कार्यवाही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.

हा निर्णय IT नियम 2021 च्या तिसऱ्या भागानुसार घेण्यात आला असून,

यात डिजिटल माध्यमांना भारताच्या संप्रभुता, एकात्मता, राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र संबंधांवर परिणाम

करणाऱ्या सामग्रीपासून दूर राहण्याची सक्त सूचना आहे. नियम ३(१)(ब) नुसार अशा सामग्रीचे स्वतःहून

परीक्षण व नियंत्रण करणे हे डिजिटल प्लॅटफॉर्म्सचे कर्तव्य आहे.

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय नागरिकांचे प्राण गेले होते.

या घटनेचा संबंध पाकिस्तानमधील राज्य व गैर-राज्य घटकांशी असल्याचे उघड झाले.

त्या पार्श्वभूमीवरच ही कारवाई करण्यात आली आहे. सरकारने स्पष्ट केले की,

पाकिस्तानातून आलेली कोणतीही सामग्री विकत घेतली असो वा मोफत असो, ती भारतात प्रसारित होणार नाही.

Read Also : https://ajinkyabharat.com/jammu-and-kashmir-semever-black-alert/

Related News