जम्मू-काश्मीर सीमेवर ब्लॅक अलर्ट

जम्मू-काश्मीर सीमेवर ब्लॅक अलर्ट

अकोला | ८ मे २०२५ — जम्मू-काश्मीर सीमेवर सुरक्षा यंत्रणांकडून जारी करण्यात आलेल्या

ब्लॅक अलर्ट मुळे अकोट तालुक्यातील ४० भाविकांचा गट पठाणकोटमध्ये अडकला आहे.

या गटात भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण डिक्कर,

Related News

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर मानकर यांचाही समावेश आहे.

हे सर्वजण वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी गेले होते. मात्र सुरक्षा कारणास्तव सीमावर्ती भागात प्रवासावर निर्बंध घालण्यात आले असून,

यामुळे या गटाला पुढील प्रवास करता आलेला नाही. सध्या सर्वजण पठाणकोटमध्ये सुरक्षित आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून सतत संपर्कात राहून मदत आणि मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

प्रशासन त्यांच्या सुरक्षित परतीसाठी केंद्र व स्थानिक यंत्रणांशी समन्वय साधत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/pakistan/

Related News