मुंबई | ८ मे २०२५ – भारतीय लष्कराने अंमलात आणलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर
देशभरात सुरक्षेचा उच्चतम अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यामुळे देशातील उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील एकूण २७ नागरी विमानतळे
Related News
राजस्थानच्या लाठीमधून पाकिस्तानी वैमानिक जिवंत पकडला, JF-17 लढाऊ विमानात होता सवार
अखेर युद्ध पेटलं… पाकिस्तानचे ड्रोन हल्ले निष्फळ; भारताकडून इस्लामाबाद-लाहोरवर क्षेपणास्त्रांचा मारा, कराचीवर नौदलाचा हल्ला
ऑपरेशन सिंदूर : लाहोरनंतर इस्लामाबादवर हल्ला,
रावळपिंडी स्टेडियमजवळ ड्रोन हल्ला
“वीज नाही” अशी तक्रार महागात;
चारधाम यात्रेत हेलिकॉप्टरचा अपघात;
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा डिजीटल स्ट्राइक!
वाडेगावात वादळी वाऱ्याचा कहर
संकटांशी झुंज देणाऱ्या उर्वशी संघवी यांचे प्रेरणादायी यश
मुंबईकरांचा प्रवास महागला!
‘या खुदा, आज बचा लो’ – पाकिस्तानच्या संसदेत खासदाराचा भावनिक आवेग
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानची बिथरलेली कुरापत:
१० मे रोजी सकाळी ५.२९ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.
याचा थेट परिणाम देशातील हवाई वाहतुकीवर झाला असून, हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
त्याचबरोबर, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळदेखील आज ६
तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,
आज (८ मे) सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रनवे देखभालीसाठी बंद राहणार आहे.
या वेळेत कोणतीही उड्डाण किंवा आगमन प्रक्रिया होणार नाही.
हवाई सेवा विस्कळीत:
-
७,४३० उड्डाणे रद्द, ज्यात फक्त आजच ४३० भारतीय विमानसेवा आणि १४७ पाकिस्तानी उड्डाणांचा समावेश.
-
काश्मीर ते गुजरात दरम्यानच्या पश्चिम हवाई क्षेत्रात नागरी उड्डाणे थांबलेली.
-
विदेशी विमान कंपन्यांनी पाकिस्तानी हवाई क्षेत्र टाळून मुंबई-अहमदाबाद मार्ग निवडला.
-
भारतात इस्लामाबादकडे जाणाऱ्या काही विमानांनी “यू-टर्न” घेतल्याचं फ्लाइट रडार डेटावरून दिसले.
बंद राहणारी प्रमुख विमानतळे:
श्रीनगर, जम्मू, लेह, अमृतसर, चंदीगड, पठाणकोट, जोधपूर, भुज, राजकोट, पोरबंदर, ग्वाल्हेर,
हिंडन यांसारखी अनेक महत्त्वाची विमानतळे फक्त लष्करी अथवा आपत्कालीन सेवांसाठी कार्यरत राहतील.
सामान्य नागरी आणि चार्टर्ड उड्डाणे पूर्णतः थांबवण्यात आली आहेत.
या पार्श्वभूमीवर, प्रवाशांनी आपापल्या विमानसेवेच्या अधिकृत वेबसाईटवर वेळोवेळी अपडेट
तपासावेत आणि जिथे असाल तिथेच सुरक्षित राहा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/mumbaikrancha-migration-mahagala/