अवकाळी पावसाने मराठवाड्यात हाहाकार

अवकाळी पावसाने मराठवाड्यात हाहाकार

मराठवाड्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले असून,

पुढील आठवडाभर हवामान अस्थिर राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

9 ते 15 मे 2025 या कालावधीत मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

Related News

कमाल व किमान तापमानात घट होण्याचे संकेत आहेत. बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी,

जालना या जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यांनी शेतात उभी पिके जमीनदोस्त केली आहेत.

प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, काही जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ताशी 50-60 किमीपर्यंत जाण्याची शक्यता असून,

मेघगर्जनेसह गारपीट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी सूचना

  1. काढणी झालेली हळद योग्य प्रकारे वाळवून सुरक्षित गोदामात साठवावी.

  2. उन्हाळी भुईमुगात रसशोषक किडींचा बंदोबस्त करण्यासाठी निंबोळी अर्क किंवा नैसर्गिक कीडनाशकांची फवारणी करावी.

  3. केळी, आंबा, द्राक्ष या फळपिकांमध्ये वादळी वाऱ्यामुळे होणाऱ्या फळगळ रोखण्यासाठी सावली व पाणी व्यवस्थापनावर भर द्यावा.

  4. द्राक्ष छाटणी पावसाच्या आधीच पूर्ण करावी आणि बागेत योग्य खत व्यवस्थापन करावे.

Read Also : https://ajinkyabharat.com/jammu-and-kashmir/

Related News