उपविभागीय अधिकारी गायब, कोतवाल धडाडीवर

उपविभागीय अधिकारी गायब,

बाळापूर (३ मे):

ज्यांच्यावर कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे, तेच जर कायद्याला बगल देत असतील,

तर मग सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे धाव घ्यायची?

Related News

लोहारा–डोंगरगाव मार्गावर उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्या चालक आणि दोन कोतवालांनी MH-30 BD-3546 क्रमांकाच्या

वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर सकाळच्या सुमारास कारवाई केली.

मात्र, या कारवाईच्या वेळी घटनास्थळी एकही तलाठी किंवा मंडळ अधिकारी उपस्थित नव्हता.

कारवाई की छळ?

वाहनचालकाकडे वैध रॉयल्टी असतानाही, ती तपासण्याआधीच वाहन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले.

वाहन मालक शाहरूख देशमुख यांनी स्पष्ट सांगितले की, “मी रॉयल्टी चालकाकडे दिली होती,

पण तपासण्याआधीच गाडी जप्त केली. मी तहसीलदार अनिल फरतारे यांना फोन केला,

त्यानंतर तलाठी आले आणि रॉयल्टी वैध असल्याचे स्पष्ट केले. तरीही वाहन सोडले गेले नाही.”

प्रश्नांची मालिका — उत्तर मात्र मौनात!

या घटनेबाबत पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यांनी फोन न उचलण्याचं ठाम धोरणच घेतल्यासारखं वागणं केलं.

तीन वेळा संपर्क साधूनही कुठलाही खुलासा मिळाला नाही. ही जबाबदारीपासून पळवाट आहे का?

“कोतवालांचे ‘स्वतःचे कायदे'”?

बाळापूर तालुक्यात या चालक व कोतवालांची कारवाई म्हणजे स्वतःचे कायदे राबवणं चाललं आहे.

ना कोणताही आदेश दाखवला जातो, ना महसूल अधिकाऱ्यांची साथ असते — तरीही तपासणी सुरूच आहे.

या ‘धडाडी’ला वरच्यांचे आशीर्वाद आहेत का?

दुहेरी निकषांची कहाणी:

बाळापूर शहरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना मुरूम आणि गोंण खणिजाचे उत्खनन सर्रास सुरू आहे.

दररोज ट्रॅक्टरने मुरूम वाहतूक होते, कोणतीही परवानगी किंवा रॉयल्टी न घेता. महसूल आणि पोलिस प्रशासन मात्र गप्प.

रॉयल्टीवाल्यांनाच त्रास — बेकायदेशीरांना मोकळं रान?

जे कायदेशीर उत्खनन करतात, नियम पाळून रॉयल्टी भरतात,

त्यांच्यावरच कारवाई केली जाते — जप्ती, चौकशी, अपमान. ही कायदाचं अंमलबजावणी आहे की सूडबुद्धी?

तालुक्यातील धोक्याची नोंद:

सोनाळा, बोरगाव, माजरी, पुर्णा, मन नदी आणि इतर अनेक नाल्यांमधून दररोज अवैधरित्या रेती आणि मुरूम नेली जाते.

या सर्व प्रकाराकडे महसूल व पोलिस प्रशासन सोयीस्करपणे डोळेझाक करत आहे.

“कोण सरकार आणि कोण चोर?”

जर कायदा पाळणाऱ्यांनाच त्रास आणि बेकायदेशीरांना मोकळं रान असेल,

तर जनतेनेच प्रशासनालाच चौकशीला बसवलं पाहिजे. आता वेळ आली आहे — “कोण सरकार आणि कोण चोर?” हे ठरवण्याची!

Read Also : https://ajinkyabharat.com/baravichya-extract-yandahi-mulinchi-baji/

Related News