IPL 2025 | मुंबई – आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या अवघ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी
या युवा क्रिकेटपटूने अशा कामगिरीची नोंद केली आहे, जी आजवर विराट कोहली,
धोनी, रोहित शर्मा यांसारखे दिग्गजही करू शकले नाहीत. सूर्यवंशीने अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावून
Related News
इंडियन आयडॉल विजेता पवनदीप राजन यांचा अपघात
पाकिस्तानमध्ये आठवडाभरात तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के!
उपविभागीय अधिकारी गायब, कोतवाल धडाडीवर
बारावीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी!
बारावीचा निकाल जाहीर
पुणे महामार्गावर तरुणाचा जीवघेणा स्टंट
कौटुंबिक वादातून संतापजनक घटना
अकोल्यात NEET परीक्षेसाठी 7848 विद्यार्थ्यांची उपस्थिती
अकोल्यात भीषण अपघात
चारधाम यात्रा करणार सोपी
तामिळनाडूतील मच्छिमारांवर श्रीलंकन लुटारूंचा हल्ला
पाकिस्तान ध्वजावाहक जहाजांना भारतात प्रवेशबंदी
आयपीएलमधील सर्वात जलद शतक झळकावणारा पहिला भारतीय आणि दुसरा खेळाडू ठरला आहे.
ब्रायन लारा – वैभवचा आदर्श!
वैभव सूर्यवंशीने सर्वाना आश्चर्यचकित करत सांगितलं की, त्यांचा आदर्श क्रिकेटपटू ना विराट कोहली आहे,
ना धोनी, ना रोहित… तर थेट वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा आहे!
तो देखील डावखुरा फलंदाज असल्याने लाराच्या शैलीकडे वैभव नेहमीच आकर्षित झाला.
2024 मध्ये झालेल्या अंडर-19 आशिया चषकादरम्यान सोनी स्पोर्ट्स नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत वैभवने सांगितले,
“मी सध्या माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करतोय. माझ्या आजूबाजूला काय घडतंय याकडे मी दुर्लक्ष करतो.
माझं लक्ष एकावेळी एका सामन्यावर केंद्रित आहे.”
त्याने पुढे स्पष्ट केलं,
“ब्रायन लारा माझा आयडॉल आहे. मी त्याच्या स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचबरोबर
माझं स्वतःचं कौशल्य आणि नैसर्गिक खेळही जपण्याचा प्रयत्न करतो.”
लाराने निवृत्ती घेतली, तेव्हा वैभव जन्मलाच नव्हता!
खास बाब म्हणजे ब्रायन लाराने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर
3 वर्षांनी 2011 मध्ये वैभवचा जन्म झाला!
म्हणजेच वैभवने लाराला खेळताना प्रत्यक्ष पाहिले नसले तरी त्याचे व्हिडीओ पाहून त्याच्यापासून प्रेरणा घेतली आहे.
नवा स्टार उदयास येतोय!
अवघ्या 14 व्या वर्षी आयपीएलमध्ये अशा पद्धतीने आपली छाप पाडणारा वैभव सूर्यवंशी भविष्यात
भारतीय क्रिकेटला एक नवा स्टार देऊ शकतो, अशीच सर्व चाहत्यांची अपेक्षा आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/baravicha-fi-jaheer/