अकोला, दि. १ मे –
“गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थाने पुढे यावे.
ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या
Related News
चारधाम यात्रा करणार सोपी
तामिळनाडूतील मच्छिमारांवर श्रीलंकन लुटारूंचा हल्ला
पाकिस्तान ध्वजावाहक जहाजांना भारतात प्रवेशबंदी
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
प्रेमसंबंधामुळे चिडलेल्या पित्याचे राक्षसी रूप
श्री लैराई देवीच्या यात्रेत भीषण चेंगराचेंगरी
अंतराळात आनंदाचा क्षण!
अकोला: जुना शहर पोळा चौकात युवकावर जीवघेणा हल्ला
अकोला: नवीन उड्डाणपुलावर दुचाकी अपघात
झांसी: डीजे वाजवल्याच्या वादातून गोंधळ
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्समधून ‘या’ 5 खेळाडूंना दाखवला जाईल बाहेरचा रस्ता?;
“भारत युद्ध करेल” भीतीने थरथरलेला पाकिस्तान!
मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी आज चांदुर येथे केले.
‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!’ या विशेष स्वच्छता अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत चांदुर येथे करण्यात आला.
हा उपक्रम १ मे ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान राबवण्यात येणार आहे.
स्वच्छतेसाठी एकत्र येण्याचे आवाहन:
मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्या हस्ते नाडेप खड्ड्याच्या माध्यमातून खतनिर्मिती मोहिमेला सुरुवात झाली.
त्या म्हणाल्या, “स्वच्छ भारत मिशनच्या टप्पा २ अंतर्गत प्रत्येक गावात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचे कार्य सुरू आहे.
कंपोस्ट खड्ड्यांमुळे पर्यावरणस्नेही खतनिर्मिती शक्य होणार आहे.”
कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती:
कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, अनिता तेलंग, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे,
प्रेमा पटोकार, अर्चना डोंगरे, संतोष चतारकर, ग्रामपंचायत सरपंच वैभव माहुरे, उपसरपंच संजीव कोरडे,
माजी सदस्य लखु लंगोटे, शिक्षक व महिला कार्यकर्त्या यांची उपस्थिती होती.
स्वच्छता दूत श्री. सखाराम इंगळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन:
सरपंच वैभव माहुरे यांनी “प्रत्येक कुटुंबाने ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवावा.
कंपोस्ट खत व पुनर्प्रक्रियेमुळे आपले गाव स्वच्छ आणि टिकाऊ होईल,” असे सांगत ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
विशेष उपक्रम – १ ते १० मे:
महाराष्ट्र दिन सप्ताहात संकलित कचऱ्यातून खतनिर्मिती करण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी अरविंद शिंदे यांनी केले, तर आभार पोलीस पाटील देविदास बोदळे यांनी मानले.
Read Also : https://ajinkyabharat.com/maharashtrcha-6th-establishment-day/