कर्जमाफीवरून बच्चू कडू यांचा घणाघात

कर्जमाफीवरून बच्चू कडू यांचा घणाघात

मुंबई – कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात तापलेलं वातावरण आता आणखी चिघळलं आहे.

प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

अजित पवार यांनी नुकतेच “आपण कुठेही कर्जमाफीविषयी बोललो नाही” असं विधान केलं होतं.

Related News

त्यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, “कर्जमाफीविषयी अजित पवारांनी भले काही न सांगितलं

असलं तरी त्यांना उपमुख्यमंत्रिपदावर बसवणाऱ्या भाजपाने मात्र कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मग जबाबदारी कोणाची?”

“भाजप राष्ट्रवादीचा बाप आहे, त्यामुळे जबाबदारी झटकून चालणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी थेट घणाघात केला.

राजकीय वाद वाढणार?

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा केला आहे.

कर्जमाफीच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलने सुरू असताना, अशा विधानांमुळे

भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर दबाव वाढू शकतो.

Read Also : https://ajinkyabharat.com/gram-vikasawar-ceo-anita-meshram-yancha-call/

Related News