नाशिकमध्ये आरोपी ‘क्रिश’ची थरारक पलायनकथा

नाशिकमध्ये आरोपी 'क्रिश'ची थरारक पलायनकथा; पोलिसांच्या डोळ्यासमोरून दुचाकीवरून पसार

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या बाहेर मंगळवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली.

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी क्रिश शिंदे पोलिसांच्या ताब्यातून फिल्मी अंदाजात पळून गेला.

Related News

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून सध्या ती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी अटक केलेल्या क्रिश शिंदे याला कोर्टात हजर करून पुन्हा पोलीस ठाण्यात परत आणलं जात होतं.

सरकारी गाडीतून उतरत असतानाच त्याने अचानक धाव घेतली आणि पोलिसांना चकमा देत थेट फरार झाला.

त्यानंतर काही क्षणांतच एका दुचाकीवर बसून तो घटनास्थळावरून पसार झाला.

प्राथमिक माहितीनुसार, त्याच्या एका साथीदाराने दुचाकी घेऊन आधीच तयारीत उभा होता, ज्याच्या मदतीने क्रिशने हे पलायन केलं.

सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली थरारक घटना

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून, त्यात आरोपी क्रिश पोलिसांच्या डोळ्यासमोरून कसा धावत जातो,

आणि दुचाकीवर बसून पळून जातो, हे स्पष्टपणे दिसून येत आहे.

पोलिसांनी लगेच शहरभर नाकाबंदी करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याचा तपशील मिळालेला नव्हता.

पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

या घटनेमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोर्टातून थेट पोलीस ठाण्यात

परतत असताना आरोपीच्या हातातून पलायन होणं, ही गंभीर सुरक्षा चूक मानली जात आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी संबंधित पोलिसांवर चौकशी सुरू केली असून,

आरोपीच्या अटकेसाठी विशेष पथक तैनात करण्यात आलं आहे.

क्रिश शिंदेचं हे फिल्मी पलायन पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरलं आहे.

आता सर्वांच्या नजरा या आरोपीवर लागल्या असून तो केव्हा आणि कुठे सापडतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/pakistanchaya-destruction/

Related News