29 ऑगस्टला मुंबईत आमरण उपोषण!

29 ऑगस्टला मुंबईत आमरण उपोषण!

पुणे | प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरुद्ध आंदोलनाची घोषणा केली आहे.

29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला असून,

Related News

“फक्त मला सोडायला या, एवढंच पुरे आहे” असं ते भावनिक आवाहन करताना म्हणाले.

 “सरकारकडून फसवणूक, आता संयम नाही”

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले,

“सरकारने चार मागण्या मान्य केल्याचं सांगितलं होतं.

मात्र तीन महिने झाले तरी कुठलीच अंमलबजावणी नाही.

समाजाच्या मुलांचे प्रश्न पाहून आता संयम सुटत आहे.”

 1 ऑगस्टला आंदोलनाच्या पुढील टप्प्याची घोषणा

“29 ऑगस्ट रोजी मुंबईत आझाद मैदान किंवा मंत्रालयासमोर आमरण उपोषण करणार आहे.

त्याआधी 1 ऑगस्टला आंदोलनाच्या पुढील दिशेची घोषणा करणार आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

“कामं आटपून घ्या, आता माघारी यायचं नाही,” असा संदेश त्यांनी मराठा समाजाला दिला.

 मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळांवर हल्लाबोल

जरांगेंनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार टीका केली.

“फडणवीस साहेब, सत्ता जात असते, पण खुन्नस डोक्यात गेली तर लोक बदला घेतात. गर्वात राहू नका. काँग्रेसची ५० वर्षांची सत्ता गेली, तुमचीही जाईल.”

“आता गॅझेट, केसेस आणि मराठा-कुणबी एक आहेत याचे अध्यादेश तातडीने काढा. प्रमाणपत्र वाटप सुरु करा,” अशी मागणी त्यांनी ठामपणे केली.

 “शांततेत उपोषणच आता शेवटचा पर्याय”

“माझ्या समाजाला शांततेत उपोषण केल्याशिवाय न्याय मिळणार नाही. तुम्ही रुसू नका, माझ्यासोबत उभं राहा.

हे तुमच्या लेकरा-बाळांसाठी आहे,” असं आवाहन त्यांनी केलं.

सात कोटी मराठा समाज जरांगेंच्या पाठीशी असल्याचा दावा करत, त्यांनी आता

निर्णायक टप्प्याकडे पावले टाकली आहेत. येत्या काही दिवसांत आंदोलनाची दिशा आणि सरकारची प्रतिक्रिया याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/fancha-king-ganaraya-charani/

Related News