नेहानेच अट घातली होती’; मेलबर्न शो वादावर आयोजकांचा आणखी खुलासा, काय म्हणाली नेहा कक्कर?

गायिका नेहा कक्कर व्यासपीठावर रडली

मेलबर्नमध्ये मार्च महिन्यात पार पडलेल्या नेहा कक्करच्या वादग्रस्त

कॉन्सर्ट प्रकरणावरून अजूनही नवा वाद निर्माण होत आहे.

सिडनी आणि मेलबर्नमध्ये सलग दोन दिवसांचे कार्यक्रम असतानाही, मेलबर्न शोदरम्यान

Related News

कमी गर्दी पाहून गायिका नेहा कक्कर व्यासपीठावर रडली आणि आयोजकांवर गंभीर आरोप केले.

मात्र, आयोजकांनी केलेल्या नवे खुलासे पाहता, हा प्रकार एकतर्फी नव्हता,

तर त्यामागे नेहाचीही जबाबदारी ठसठशीत आहे, असं चित्र आता स्पष्ट होत आहे.

आयोजक पेस डी आणि विक्रम सिंग रंधावा यांनी प्रसिद्ध माध्यम प्रतिनिधी

सिद्धार्थ कण्णनला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं की, नेहाने शो सुरू करण्याआधी

अट ठेवली होती की “जर प्रेक्षकांची संख्या समाधानकारक नसेल, तर ती परफॉर्म करणार नाही.

” मेलबर्नमध्ये फक्त 700 चाहत्यांची उपस्थिती असल्यामुळे नेहाने व्यासपीठावर तीन तास वाट पाहूनही गाणं गायलं नाही.

यामुळे तिकीट विकत घेतलेल्या चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.

नेहाने यावर आरोप केला होता की आयोजकांनी ना हॉटेलची, ना जेवणाची,

ना ट्रान्सपोर्टची व्यवस्था केली होती. पण आयोजकांनी याचा स्पष्ट प्रतिवाद करत सर्व पुरावे सादर केले आहेत.

त्यांनी नेहासाठी हॉटेल, कार आणि प्रवासाची पूर्वतयारी पूर्ण केली होती, असा दावा केला आहे.

या सगळ्या प्रकरणातून आयोजकांचे तब्बल 500,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावर सध्या नेहाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र,

सोशल मीडियावर तिच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी जोरदार चर्चा सुरू केली आहे.

नेहा कक्करने तिच्या इंस्टाग्रामवरून केवळ एक भावनिक पोस्ट शेअर करत

“काही लोक फक्त तुमचं यश पाहू शकत नाहीत,

” असं सूचक वक्तव्य केलं आहे. हे वक्तव्य आयोजकांवर अप्रत्यक्ष टोमणा आहे का,

याचीही चर्चा रंगू लागली आहे.

आता हे प्रकरण नेमकं कुठे थांबतं, आणि नेहा यावर थेट उत्तर देते का,

हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Read more here

https://ajinkyabharat.com/akshayya-tritiyachya-muhurtawawar-sonyachaya-darat-ghasaran-khedi-kredisathi-suvarnasandhi/

Related News