बंगळुरू / तिरुपूर :
उन्हाळा सुरू होताच आइसक्रीमची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते.
थंडगार आणि गोडसर चव असलेली आइसक्रीम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवडती असते.
Related News
‘माझा मुलगा तुमच्या मनोरंजनासाठी नाही’
आफ्रिदीचा बेताल आरोप….
एल्फिन्स्टन पुलाच्या मार्गातील अडथळा दूर;…..
पुण्यात दुर्दैवी अपघात
यूपीमध्ये कामकाजी महिलांसाठी योगी सरकारकडून मोठी सौगात
प्रादुर्भाव टाळण्यासाठी भुईमूग काढणीवेळी घ्यावयाची काळजी
भारताच्या मदतीनंतरही तुर्कीचा पाकिस्तानला लष्करी पाठिंबा
भोपालमध्ये युवकाचा नशेत धिंगाणा
अकोल्यात पोलिसांचे धडाकेबाज कोंबिंग ऑपरेशन;
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर शेतकऱ्यांचा रोष;
अकोल्यात चोरट्यांचा देवस्थानावर हल्ला
१६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी
बाजारात विविध फ्लेवर्स, रंग आणि आकारात आइसक्रीम सहज उपलब्ध असते.
मात्र, या स्वादामागे काही धोकादायक सत्य लपले आहे, जे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
कर्नाटकात धक्कादायक प्रकार उघड :
अलीकडे कर्नाटकातील अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाच्या (FDA) छाप्यांमध्ये काही ठिकाणी
अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत आइसक्रीम तयार होत असल्याचे उघड झाले आहे.
काही दुकानदार आणि कंपन्या आइसक्रीममध्ये सिंथेटिक दूध, डिटर्जंट, यूरिया,
बनावट रंग आणि साखरीनसारखे घातक रसायने मिसळत असल्याचे समोर आले आहे.
तसेच आइसकँडी आणि कोल्ड ड्रिंक्समध्येही घाणेरड्या पाण्याचा आणि आवश्यकता पेक्षा
अधिक फ्लेवरचा वापर करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे.
सेहतेवर गंभीर परिणाम :
अशा प्रकारच्या बनावट आणि घातक पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
त्यामुळे आइसक्रीम विकत घेताना त्याची गुणवत्ता तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
तिरुपूरमध्ये खराब टरबूज जप्त :
तामिळनाडूमधील तिरुपूर येथे फूड सेफ्टी डिपार्टमेंटने कारवाई करत खराब रंगयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे टरबूज जप्त केले.
या कारवाईत तब्बल २,००० किलो खराब टरबूज नष्ट करण्यात आले.
विभागाने नागरिकांना बाजारातून टरबूज खरेदी करताना त्याची गुणवत्ता स्वतः तपासण्याचा सल्ला दिला आहे.
सावधगिरी बाळगा :
गर्मीमुळे मिळणाऱ्या तात्पुरत्या थंडगार अनुभवासाठी आपल्या आरोग्याशी तडजोड करू नये.
त्यामुळे आइसक्रीम, फळे आणि थंड पेये खरेदी करताना त्यांची गुणवत्ता आणि स्वच्छता तपासणे अत्यावश्यक आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolidat-polysancha-dhadkebaz-kombing-operation/