नवी दिल्ली –
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 28
निष्पाप नागरिकांचा मृत्यू, तर 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाल्यानंतर
Related News
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात सूर्य आग ओकतंय! अकोला-चंद्रपूर 45 अंशांच्या पुढे; तुमचं शहर किती तापलंय?
अरबी समुद्रात पाकिस्तानची हालचाल, युद्धनौकांवरून क्षेपणास्त्र सराव; भारतीय नौदलही उच्च सज्जतेवर
भारताच्या कठोर निर्णयांनंतर पाकिस्तानचा खवळलेला सूर; युद्धाची भाषा आणि हवाई हद्दीचा बंदी निर्णय
पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ खोटा;
केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांची उपस्थिती
पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्याचा पाकिस्तानच्या शेअर बाजारावर परिणाम;
पोलिसांची वेगवान कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर अकोल्याचे ३१ पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले;
अकोल्यात विद्युत केबल चोरी करणाऱ्या चोराला अटक
बारामुल्ला येथे घुसखोरीचा प्रयत्न उधळला; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान,
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण?
धारगड येथे वयोवृद्ध महिलेस प्राणघातक मारहाण;
भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलली आहेत.
या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अटारी सीमेवरील चेकपोस्ट तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे पाकिस्तानला तब्बल 3000 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसणार असल्याचा अंदाज आहे.
अटारी बॉर्डर – भारत-पाक व्यापाराचा एकमेव जमीनी मार्ग
मीडिया रिपोर्टनुसार, अटारी बॉर्डर हा भारत आणि पाकिस्तानमधील
एकमेव जमीनी मार्ग आहे ज्याद्वारे दोन्ही देशांमध्ये व्यापार सुरू होता.
भारत या मार्गाने पाकिस्तानला सोयाबीन, कोंबडीचा खाद्यपदार्थ, भाज्या,
प्लास्टिकचे कण, लाल मिरची यांसारख्या अनेक वस्तूंची निर्यात करतो.
दहशतवाद्यांना प्रतिउत्तर म्हणून आर्थिक धक्का
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली असून,
सरकारने घेतलेला हा निर्णय पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या झटका देण्यासाठी महत्त्वाचा पाऊल म्हणून पाहिला जात आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमधील व्यापारी व औद्योगिक गटांवर मोठा परिणाम होणार असून,
पुढील काळात आणखी कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/polysanchi-vegwan-action/