शिवसेना (ठाकरे गट) चे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर अर्ज फेटाळला

शिवसेना (ठाकरे गट) चे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर अर्ज फेटाळला

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजिप्र) अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करून खंडणीची

मागणी केल्याप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) चे अकोला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

अकोट सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

Related News

प्रकरणानुसार, हिंगणी येथे मजिप्राचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या सर्कल अंतर्गत सुमारे

५० लाख रुपयांच्या कामांसाठी जिल्हाप्रमुख दातकर यांनी ५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

इंगळे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर, दातकर यांनी “जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत,

तोपर्यंत सर्कलमध्ये कोणतेही काम होणार नाही” अशी धमकी दिली होती. त्याचबरोबर त्यांनी इंगळे

यांना जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत नमूद आहे.

यावर आधारित दाखल झालेल्या अटकपूर्व जामीन अर्जासह,

दातकर यांना पंधरा दिवसांचे अंतरिम संरक्षण देण्याची मागणी करणारा अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे.

या निर्णयामुळे जिल्हाप्रमुख दातकर यांची कायदेशीर अडचण अधिकच गंभीर झाली आहे.

पुढील तपास पोलीस करत आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/ambedkari-ideology/

Related News