१० कोटींची खंडणी मागितली

झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून जीवे मारण्याची धमकी; १० कोटींची खंडणी मागितली

मुंबई :

माजी मंत्री दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि आमदार झीशान सिद्दीकी यांनी डी

कंपनीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा गंभीर दावा केला आहे.

Related News

झीशान यांना ईमेलद्वारे धमकी देत १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.

दर ६ तासांनी धमकीचे ईमेल पाठवले जात असल्याची माहिती त्यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

“वडिलांसारखंच तुझंही होईल” — मेलमधील धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्याने ईमेलमध्ये म्हटले आहे की, “तुलाही तुझ्या

वडिलांसारखंच ठार मारलं जाईल.” त्यासाठी १० कोटी रुपये खंडणी म्हणून मागण्यात आले आहेत.

धमकी न दिल्यास दर सहा तासांनी मेल येत राहतील, असा देखील इशारा या मेलमध्ये देण्यात आला आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने तपास सुरू केला आहे.

ईमेल ट्रॅक करून आरोपी कोण आहे हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पोलिसांनी झीशान सिद्दीकी यांना सुरक्षा पुरवली असून, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

झीशान सिद्दीकी म्हणाले: “आतापर्यंत अनेक मेल आले”

झीशान सिद्दीकी यांनी ANI शी बोलताना सांगितले, “धमकीचं हे प्रकरण अतिशय गंभीर आहे.

आतापर्यंत मला अनेक मेल आले असून, प्रत्येक मेलमध्ये भीतीदायक भाषा वापरली आहे.

पोलिसांनी याची तत्काळ चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणीही त्यांनी केली.

Read Also : https://ajinkyabharat.com/%e2%82%b9-500-fake-notancha-alert/

Related News