भाजप आमदार हरीश पिंपळेंचा ठाणेदारावर गंभीर आरोप;

भाजप आमदार हरीश पिंपळेंचा ठाणेदारावर गंभीर आरोप;

अकोला :

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी बार्शीटाकळी पोलीस

ठाण्याचे ठाणेदार यांच्यावर फोनवर शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Related News

या प्रकरणाचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकीय आणि पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आमदार पिंपळे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ही क्लिप

पाठवून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. तसेच या प्रकाराकडे हक्कभंगाच्या मुद्द्याने लक्ष वेधण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.

प्रकरण काय?

भाजप कार्यकर्ता हरीश वाघ यांनी कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या गुरांच्या वाहनाची माहिती पोलीस ठाण्यात दिली होती.

मात्र आमदारांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी पैसे घेऊन ते वाहन सोडून दिले. याबाबत आमदार पिंपळे यांनी स्वतः

ठाणेदारांकडे फोनवरून विचारणा केली असता, ठाणेदाराने कार्यकर्त्यासह आमदारांनाही शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर आमदार हरीश पिंपळे यांनी एक ऑडिओ क्लिप जारी करत ठाणेदाराच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे.

रात्री उशिरा ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, पोलीस खात्यात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.

सूत्रांनुसार, आमदारांच्या तक्रारीनंतर संबंधित पोलिसाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून,

आगामी काळात आमदार हक्कभंग प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/agra-bjp-leaders/

Related News