कर्जमाफीसाठी ठाकरे गटाचा इशारा — २ मे रोजी ट्रॅक्टर मोर्चा

कर्जमाफीसाठी ठाकरे गटाचा इशारा — २ मे रोजी ट्रॅक्टर मोर्चा

अकोला :

विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने सरकारने अद्याप पूर्ण न केल्याचा आरोप करत शिवसेना (ठाकरे गट)

ने राज्य सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.

Related News

२ मे रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात

येणार असल्याची माहिती आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

त्यांनी सांगितले की, “राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते,

मात्र ती अद्याप प्रत्यक्षात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.”

याचबरोबर आमदार देशमुख यांनी सत्ता पक्षाला इशारा देत सांगितले की,

जर २ मे पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर हाच मोर्चा मुंबईकडे वळवण्यात येईल.”

यावेळी त्यांनी जाहीर केले की, “१ मे पर्यंत विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील सुमारे

पाच लाख शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांच्या अडचणी आणि मागण्या थेट समजून घेता येतील.”

शिवसेना ठाकरे गटाच्या या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/%e2%9c%9d%ef%b8%8f-akolidya-easter-sandhacha-utsav-mothya-shraddha-and-enthusiast-sajra/

Related News