कांगो | १७ एप्रिल २०२५
अफ्रिकेतील कांगो नदीवर एक अत्यंत वेदनादायक बोट दुर्घटना घडली असून,
आतापर्यंत किमान १४८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी अजूनही बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे.
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
ही दुर्घटना इतकी भीषण होती की संपूर्ण जगाला हादरवून टाकणारा क्षण ठरला.
कांगो नदी ही आफ्रिका खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी असून,
डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो (DRC) या देशातून वाहणारी ही नदी स्थानिक रहिवाशांसाठी वाहतुकीचा महत्वाचा स्रोत मानली जाते.
लकडीच्या बोटीतून सुरू झालेला मृत्यूचा खेळ
ही दुर्घटना मंगळवारी (१६ एप्रिल) HB कोंगोलो नावाच्या मोटरबोटमध्ये घडली.
या बोटीची बनावट मुख्यतः लकडीची होती. बोट मातानकुमु बंदरगाहातून निघून बोलोंबा क्षेत्राकडे जात होती.
प्रवाशांनी भरलेल्या या बोटीवर एक महिला जेवण तयार करत असताना चूल्ह्यातून चिंगारी उडाली,
आणि काही क्षणांतच संपूर्ण बोट आगीत भस्मसात झाली.
नदी सुरक्षा विभागाचे अधिकारी कॉम्पिटेंट लोयोको यांनी दिलेल्या माहितीनुसार,
आग इतक्या झपाट्याने पसरली की बोटीला सावरायची संधीही मिळाली नाही आणि ती नदीत उलटली.
अद्याप शोध मोहिम सुरू
रॉयटर्स न्यूज एजन्सीच्या अहवालानुसार, या दुर्घटनेत सध्या १४८ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून,
आणखी अनेक जण बेपत्ता आहेत. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा नदीतून मृतदेह वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.
अनेक कुटुंबांनी आपल्या प्रियजणांच्या शोधासाठी धावपळ सुरू केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/florida-aircraft/