पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!

पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!

प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घडामोड समोर आली आहे.

म.न.से अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)

Related News

प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट युतीचा प्रस्ताव दिला आहे.

विशेष म्हणजे या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक संकेत दिले आहेत.

राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “आमच्यातील भांडण हे क्षुल्लक होते,

ते मागे टाकून महाराष्ट्रासाठी एकत्र येणं आवश्यक आहे.

यावर उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “आपल्यातील किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी तयार आहे.

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का?

राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेनेपासून फारकत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती.

त्यानंतर दोघांचे राजकीय मार्ग वेगवेगळे झाले. गेल्या काही वर्षांपासून दोघांत थेट संवाद नव्हता.

मात्र आता पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेला जोर चढला आहे.

गेल्याच काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेता आमिर खानने दोघे बंधू एकत्र यावेत अशी इच्छा व्यक्त केली होती.

आता घडत असलेल्या या राजकीय हालचालीमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या नजरा पुन्हा ‘ठाकरे बंधूं’कडे वळलेल्या आहेत.

राजकारणात नवा समीकरणाचा प्रारंभ?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये

नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. युतीच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात नवे वळण येणार का?,

हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.

आगामी काही दिवसांत यावर अधिक स्पष्टता येईल, अशी अपेक्षा आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/temperature-vadimula-poultry-business/

Related News