पुणे | १७ एप्रिल २०२५ –
स्वारगेट बस स्थानकावर फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या तरुणीवरील बलात्कार
प्रकरणाचा समरी अहवाल आता समोर आला असून, त्यातून आरोपी दत्ता गाडे
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
याच्या विकृत मानसिकतेचा आणि गुन्ह्याच्या सूक्ष्म तपशीलांचा धक्कादायक पर्दाफाश झाला आहे.
पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रामध्ये ८२ साक्षीदारांचे जबाब,
१२ पंचनामे आणि विविध वैज्ञानिक तपासांचे निष्कर्ष नमूद करण्यात आले आहेत.
२५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ५:४५ ते ६:४५ वाजेदरम्यान स्वारगेट बस स्थानकाच्या फलाट
क्रमांक २२ वर पीडिता फलटणला जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना आरोपी दत्ता गाडेने तिला फसवून शिवशाही बसमध्ये नेले.
बसमध्ये प्रवासी नसल्याचा गैरफायदा घेत त्याने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला.
बस पूर्ण अंधारात होती आणि दोन्ही बाजूंनी इतर बस लावलेल्या असल्याने पीडितेचा आवाज कुणालाही ऐकू गेला नाही.
तपासात आरोपीने तो लैंगिक दृष्ट्या अक्षम असल्याचा दावा केला होता,
मात्र ससून रुग्णालयातील तीन तज्ञ डॉक्टरांच्या टीमने त्याचा अहवाल खोटा ठरवला.
त्याच्या कपड्यांवर आणि घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवरून त्याचा गुन्ह्यातील सहभाग निश्चित झाला.
तसेच आरोपीच्या गुगल सर्च हिस्ट्रीतून तो वारंवार पॉर्न पाहत असल्याचे उघड झाले.
त्याचा मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फूटेज, डीएनए तपासणी आणि पीडितेचा न्यायालयीन जबाब यांनी सर्व पुरावे सिद्ध झाले आहेत.
घटनेनंतर आरोपी गुनाट गावातील ऊसाच्या शेतात लपून बसला होता. पोलिसांनी डॉग स्कॉड,
ड्रोन कॅमेरा आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला २८ फेब्रुवारी रोजी अटक केली.
सध्या त्याच्याविरोधात पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात खटला सुरु आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/buldhana-aani-parbhanit-severe-crisis/