तेल्हारा (तालुका प्रतिनिधी):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने तेल्हारा येथे भव्य
आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. ९ एप्रिल २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह, तेल्हारा येथे ही बैठक संपन्न झाली.
Related News
प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घडामोड समोर आली आहे.
म.न.से अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
प्रमुख उद्धव ठाकरे यांना थे...
Continue reading
प्रतिनिधी, अकोलासध्या विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.
अकोला जिल्ह्यात तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून,
याचा परिणाम फक्त माणसांवरच नव...
Continue reading
ऑनलाईन प्रतिनिधी |
जंगलात घडणाऱ्या जनावरांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील,
पण एका माकडाच्या टोळक्यांनी ‘गँगवॉर’सारखी भीषण झटापट केल्याचा
थरारक व्हि...
Continue reading
मैनपुरी | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला आहे.
एका पतीने आपल्या पत्नीच्या मारहाणीचा व्हिडीओ तयार करून पोलिसांकडे तक्रार केली,
म...
Continue reading
हरदोई | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक अजब व धक्कादायक घटना समोर आली आहे.
येथे एका पतीने आपल्या पत्नीची फक्त आइब्रो सेट केली म्हणून तिला चांगलाच चाप दिला –
थेट ...
Continue reading
हरिद्वार | प्रतिनिधी
उत्तराखंडमधील हरिद्वार-देहरादून महामार्गावर एका महिलेने अचानक महामार्गाच्या मध्यभागी
येऊन गाड्यांसमोर उभी राहत जोरदार गोंधळ घातल्याची घटना घडली आहे.
या घटने...
Continue reading
- ईस्टर संडेनिमित्त विविध कार्यक्रम
अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहर...
Continue reading
अजिंक्य भारत प्रतिनिधी | जानोरीमेळ
निंबा अंदुरा सर्कलमधील गजबजलेल्या मोखा गावात जानोरीमेळ गट ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार कारभाराचा प्रत्यय
सध्या ग्रामस्थांना येत आहे. ऑक्टोबर २०२४...
Continue reading
वणीसह परिसरात दि. 18 ला 5 वाजताच्या दरम्यान पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी
लावली त्यात शहर तसेच परिसरात मोठे नुकसान झाले असून अनेकांचे घराचे टिनपत्रे, वॉटर टँक, झाडे,
कं...
Continue reading
अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या दहीगाव येथील घटनेत हिंदू समाज बांधवांवर
खोटे व चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ आज तेल्हारा बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले ह...
Continue reading
अलीगढ (उत्तर प्रदेश) :
अलीगढ शहरातील अतरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 'ख्वाजा' नावाच्या हॉटेलमध्ये एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे.
येथे जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना देवी-दे...
Continue reading
नवी दिल्ली : तब्बल पाच वर्षांच्या खंडानंतर कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा एकदा 2025
मध्ये सुरू होणार आहे. भारत आणि चीनमधील द्विपक्षीय तणाव कमी झाल्यानंतर ही ऐतिहासिक यात्रा
पुन्हा ...
Continue reading
ही बैठक मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, संपर्क प्रमुख तथा उपनेते
मा. आमदार गोपीकीशन बाजोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंगदादा पिंजरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
निवडणूक तयारीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
या बैठकीस निवासी उपजिल्हाप्रमुख संतोष अनासने, उपजिल्हाप्रमुख मनिष कराळे,
जिल्हा सचिव सतीश गोपनारायण, अकोला शहर संघटक राजेश पिंजरकर,
युवासेना उपजिल्हाप्रमुख विशाल चौधरी (अकोट) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्रीरंग पिंजरकार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “महायुती सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या
विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसेना पक्ष करत आहे.
आगामी निवडणुका लक्षात घेता कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत करून कामाला लागावे.”
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश
तालुक्यातील विविध गावांमधून शिवसेनेत पक्ष प्रवेश झाले. हिवरखेडचे दीपक हिवराळे,
दानापूरचे दिनेश विखे, सचिन नांदुरकार यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रवेशामुळे तालुक्यातील संघटन अधिक मजबूत होणार आहे.
तालुका प्रमुख प्रविण वैष्णव व शहरप्रमुख अनिकेत ढवळे यांच्या नेतृत्वाखाली ही संघटन बळकटीची प्रक्रिया पार पडली.
कार्यक्रमात अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीस प्रकाश पाटील चिकटे (उपतालुकाप्रमुख, बेलखेड सर्कल), आदित्य अग्रवाल
(उपतालुकाप्रमुख, भांबेरी सर्कल), वासुदेव निंबोकार, विक्की वाघ, प्रमोद निळे, रघुनाथ विखे,
किशोर नेरकर, प्रकाश वानखेडे, गोपाल आमले, निखिल हिवराळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
शहर व तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख प्रविण वैष्णव यांनी केले.
सूत्रसंचालन प्रतिक पखान यांनी केले तर आभारप्रदर्शन शहरप्रमुख अनिकेत ढवळे यांनी केले.
शिवसेना तालुक्यात बळकटपणे उभी असून आगामी निवडणुकांत निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास या बैठकीतून व्यक्त करण्यात आला.
Read Also : https://ajinkyabharat.com/aligadamidhye-devi-devatanya-chitra-aslelya-napkinavaron-suit/