बोर्डी नदीपात्र कोरडेठाक; सहा गावांतील नागरिकांची पातुर तलावातून पाणी सोडण्याची मागणी

बोर्डी नदीपात्र कोरडेठाक; सहा गावांतील नागरिकांची पातुर तलावातून पाणी सोडण्याची मागणी

पातुर प्रतिनिधी |

माळराजुरा घाटावरील पातुर तलावात मुबलक पाणीसाठा असतानाही,

नदीपात्रात पाणी न सोडल्यामुळे बोर्डी नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे.

Related News

त्यामुळे पातुर, चिंचखेड, बोडखा, शिरला, भंडाराज व तांदळी या तलवाखालील सहा गावांतील

नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विहिरी, हातपंप आणि बोरवेलची पातळी खोल गेली

असून जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

कोरड्या नदीपात्रामुळे जंगली आणि हिंस्र प्राणी गावात शिरकाव करत असून नागरिक भयभीत झाले आहेत.

पाण्याअभावी फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

दोन महिन्यांपासून सुरू असलेली पाणीटंचाई आता विकोपाला गेली आहे.

नागरिकांची दैनंदिन वणवण सुरू असून प्रशासनाकडून ठोस पावले न उचलल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले की, “सिंचन विभागाचे कार्यकारी

अभियंता यांना ७ एप्रिल रोजी पाणी सोडण्याबाबत पत्र देण्यात आले आहे.

लवकरच पातुर तलावाचे पाणी नदीपात्रात सोडले जाईल.”

Read Also :
https://ajinkyabharat.com/petrol-pumper-ghataulichi-takrar-mahagat-padli-kriti-lathyani-mahan-3-salesman-attake/

Related News