अकोला :
प्रभू येशू ख्रिस्ताच्या यरुशलेममध्ये विजयदर्शक प्रवेशाची स्मृती म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जाणारा पाल्म संडे
(झावळ्यांचा रविवार) अकोला शहर आणि जिल्ह्यातही मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
Related News
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
माय ममता झाली काळी!
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
ख्रिश्चन धर्मीयांच्या मान्यतेनुसार, येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळले जाण्यापूर्वी सहा दिवस
आधी त्यांनी यरुशलेममध्ये प्रवेश केला होता. त्या वेळी लोकांनी झावळ्या हातात घेऊन त्यांचे स्वागत केले होते.
हीच घटना लक्षात ठेवून पाल्म संडे हा दिवस दरवर्षी मोठ्या श्रद्धेने पाळला जातो.
अकोला जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजाने सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले.
विशेषतः विदर्भातील एकमेव ख्रिश्चन कॉलनीमधून आबालवृद्धांनी झावळ्या हाती घेऊन एक रॅली काढली.
“होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादीत असो”
अशा श्रद्धाभावपूर्ण घोषणांनी परिसर भक्तिमय झाला होता.
याशिवाय, अकोला शहरातील ८ चर्चेस आणि जिल्ह्यातील ३० पेक्षा अधिक चर्चेस
मध्ये विशेष प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले. भक्तांनी आपल्या घरी ‘कॉटेज प्रेयर’चेही आयोजन केले.
यासोबतच, ५ मार्चपासून सुरू झालेल्या लेण्ट (Lent) या ख्रिश्चन धर्मातील
पवित्र महिन्याच्या पार्श्वभूमीवरही या सर्व धार्मिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.