आमगव्हान/कोंडोली : श्रीक्षेत्र कोडोली आमगव्हान येथील गौकर्णा नदीच्या पावन तीरावर वसलेल्या छत्रपती
शिवकालीन श्री गोखी हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंतीनिमित्त भक्तिमय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी होणाऱ्या या उत्सवाची सुरुवात सकाळी ५ वाजता अभिषेक व पूजनाने होणार आहे.
Related News
वाढदिवसाच्या केकवर गुन्ह्यांची कलमे! भांडुपच्या गुंडाची ‘गुन्हेगारी थाटात’ पार्टी,
बोर्डी नदीपात्र कोरडेठाक; सहा गावांतील नागरिकांची पातुर तलावातून पाणी सोडण्याची मागणी
पेट्रोल पंपवर घटतौलीची तक्रार महागात पडली; ग्राहकाला लाठ्यांनी मारहाण, 3 सेल्समन अटकेत
उमरा येथे बांधकाम कामगारांसाठी ८ दिवसांचे प्रशिक्षण शिबिर सुरू
थार गाडीच्या टपावर डान्स करणाऱ्या युवकाचा व्हिडिओ व्हायरल
हैदराबादमधील पंचतारांकित हॉटेलला भीषण आग; SRH संघाची तातडीने सुरक्षित हलवणूक
27 मजली अँटिलियाच्या टॉप फ्लोअरवरच का राहतो अंबानी परिवार? वाचा या आलिशान राजवाड्याच्या काही अनोख्या गोष्टी
विचारांचे दीप पेटवणारा कार्यक्रम : शेकापूर फाट्यावर बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी
भटोरी येथे ट्रॅक्टरखाली दबून वयोवृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
पातूर तालुक्यात ६० वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; पोलीस तपासात गुंतले
अकोल्यात पाल्म संडे भक्तिभावाने साजरा; ख्रिश्चन कॉलनीतून रॅली, प्रार्थना सभांचे आयोजन
2 हजार किलो रांगोळी, बाबासाहेबांचे विचार आणि अकोल्याची अभिमानास्पद कलाकृती
यानंतर सकाळी ९ ते १२ दरम्यान काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले असून,
यामध्ये ह.भ.प. अॅड. ऋषिकेश महाराज पाटील (आसोला बु.) व ह.भ.प. सार्थक कदम महाराज
कीर्तनाच्या माध्यमातून भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणार आहेत.
दुपारी १२.३० वाजता महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून,
सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक आशिष अर्जुनराव भगत तसेच
आमगव्हान-कोंडोली येथील समस्त शेतकरी व गावकरी मंडळींनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
उत्सवाचे स्थळ : श्री गोखी हनुमान मंदिर (संदीप), आशिष अर्जुनराव भगत यांचे शेतात,
कडबे सरांच्या शेतामागे, आमगव्हाण-कोंडोली मार्ग.