पातूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य नोंदणी मोहीम सुरु

पातूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य नोंदणी मोहीम सुरु

प्रारंभ आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते

पातूर | तालुका प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ पातूर शहर व तालुक्यात नुकताच मोठ्या उत्साहात झाला.

Related News

या अभियानाचे औपचारिक उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

या सदस्यता नोंदणी मोहिमेची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीचे प्रदेश

सचिव प्रा. मोहम्मद फरहान अमीन यांनी घेतली असून,

पातूर तालुका व शहरात जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून सदस्य नोंदणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

अभियानाची व्यापक तयारी करण्यात आली असून, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, विद्यार्थी,

युवक आणि महिलांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन फरहान अमीन यांनी यावेळी केले.

‘लाडकी बहीण’ योजनेचा दाखला

प्रा. अमीन यांनी यावेळी बोलताना सांगितले की, ‘लाडकी बहीण’ योजनेसारख्या जनहिताच्या उपक्रमांत

उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांचा मोठा वाटा आहे.

भविष्यात अशा अनेक योजना अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणार असून,

त्यासाठी पक्ष बळकट होणे आवश्यक आहे.

‘अजितदादांचा हात बळकट करा’ – आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे नेतृत्व अधिक मजबूत

करण्यासाठी व लोकसहभाग वाढवण्यासाठी सर्व नागरिकांनी,

विशेषतः भगिनींनी, या सदस्यता अभियानात भाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Related News