आकोल्यातील व्यावसायिक रमन चांडक यांचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ
अकोट | प्रतिनिधी
अकोट-पोपटखेड मार्गावरील पोपटखेड शेतशिवारात असलेल्या बंद आणि पडलेल्या
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
बोन कारखान्याच्या इमारतीत आकोल्यात वास्तव्यास असलेल्या व मूळचे पणज येथील रहिवासी असलेले
व्यावसायिक रमन चांडक यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
शेतशिवारातील बंद कारखान्यात आढळला मृतदेह
रमन चांडक यांचा मृतदेह पोपटखेड येथील जुन्या, बंद पडलेल्या बोन कारखान्याच्या इमारतीत संशयास्पद अवस्थेत आढळला.
मृतदेहाजवळ संघर्षाच्या खुणा व इतर संशयास्पद बाबी आढळून आल्यामुळे ही घटना खुनाची असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
आकोल्यात राहत होते, पणज गावचे मूळ रहिवासी
रमन चांडक हे मूळचे अकोट तालुक्यातील पणज येथील रहिवासी असून सध्या आकोला शहरात आपला व्यवसाय करत होते.
त्यांचा बंद कारखान्यात अचानक मृतदेह आढळून आल्यामुळे त्यांच्या मृत्यूमागील कारणांची चौकशी सुरू आहे.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच अकोट पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फूटेज,
कॉल डिटेल्स आणि अन्य पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
परिसरात भीतीचं वातावरण
शहरालगतच्या भागात अशा प्रकारचा खून झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळेपर्यंत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत.