सावता परिषदेच्या पातूर तालुका अध्यक्षपदी अजय ढोणे यांची निवड

सावता परिषदेच्या पातूर तालुका अध्यक्षपदी अजय ढोणे यांची निवड

पातूर (तालुका प्रतिनिधी)

सावता परिषदेच्या पातूर तालुकाध्यक्षपदी अजय ढोणे यांची निवड नुकतीच करण्यात आली

असून त्यांना नियुक्ती पत्र देऊन औपचारिक नियुक्ती देण्यात आली.

Related News

अजय ढोणे हे पातूर शहर शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून गेली १० वर्षे कार्यरत असून त्यांनी सातत्याने सामाजिक कार्य करत

लोकसंग्रह वाढवला आहे. त्यांच्या या जनसंपर्क व समाजासाठी असलेल्या कळकळीची दखल घेत त्यांची ही नियुक्ती करण्यात आली.

अजय ढोणे यांच्या निवडीमुळे समाजात आनंदाचे वातावरण असून,

विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

या वेळी पातूर पंचायत समितीचे माजी सभापती तथा शिंदे गटाचे शिवसेना नेते बालू भाऊ उर्फ अनंत बगाडे,

जिल्हाध्यक्ष लक्ष्मण निखाडे, प्रदेशाध्यक्ष पांडू काका कठाळे,

तसेच आशिष ढोमणे, प्रवीण वाघमारे आणि इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Related News