“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश

"बँकांमधील आंदोलन थांबवा" – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश

मुंबई (प्रतिनिधी):

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले

बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Related News

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला असून,

यासंदर्भात मनसेकडून अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

राज ठाकरे यांनी मनसैनिकांना उद्देशून दिलेल्या पत्रात स्पष्ट केलं आहे की,

राज ठाकरे काय म्हणाले?

मराठी भाषेच्या सन्मानासाठी आंदोलन योग्यच होतं, मात्र सध्या उद्योग विभागाकडून सकारात्मक

प्रतिसाद मिळाल्यामुळे आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

बँकांमध्ये मराठी भाषेच्या वापराबाबत मागणी करत मनसेकडून काही दिवसांपासून आंदोलन राबवले जात होते.

अनेक शाखांमध्ये प्रत्यक्ष जाऊन घोषणाबाजी करण्यात आली होती. मात्र आता ही मोहिम तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून सरकारकडून योग्य पावले उचलली जातील,

असा विश्वास दिल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

उदय सामंत काय म्हणाले?

उदय सामंत यांनीही भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार राज्यातील बँकांमध्ये

मराठी व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी सर्व समित्यांची बैठक बोलावण्यात येणार आहे.

यासंदर्भात लवकरच ठोस कारवाई करण्यात येईल.

Related News