रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा

रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा

उत्साहात जपली जाते

विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी

अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली

महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहाची अनोखी परंपरा आजही तेवढ्याच भक्तीभावाने आणि उत्साहात पाळली जात आहे.

Related News

ही ऐतिहासिक परंपरा आदिवासी कोळी महादेव जमातीने पिढ्यान्‌पिढ्या जपली असून,

रेलेश्वर संस्थानच्या वतीने दरवर्षी चैत्र नवमीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावात हा विवाह सोहळा साजरा केला जातो.

यावर्षी हा सोहळा शनिवार, ५ एप्रिल रोजी पार पडणार आहे.

वास्तविक विवाहासारखा भव्य सोहळा

या विवाह सोहळ्यात खऱ्याखुऱ्या लग्नाप्रमाणेच वधू-वर पक्षातील पाहुणे, वाजंत्री,

मंगलाष्टके, स्वागत समारंभ, मान-सन्मान, जेवणावळी अशा सर्व विधी मोठ्या थाटात पार पडतात.

या सोहळ्यात इंगळे कुटुंबाकडे माता पार्वती (वधू) आणि घुगरे कुटुंबाकडे भगवान महादेव (वर) यांचा मान असतो.

या दोन्ही कुटुंबांकडे याबाबतचा पारंपरिक सन्मान कायम आहे.

विदर्भ ते कोकण – सर्वत्रून आदिवासी बांधवांची उपस्थिती

या दिवशी रेल गावात विदर्भासह कोकण, मुंबई, पुणे, मराठवाडा, जळगाव-खान्देश आदी

भागांतून शेकडो आदिवासी कोळी बांधव उपस्थित राहतात.

तरुण-तरुणी, महिला मोठ्या संख्येने या धार्मिक व सांस्कृतिक उत्सवात सहभागी होतात.

ऐतिहासिक रेलेश्वर मंदिर आणि परंपरेचे वैभव

या लग्न सोहळ्याचे मुख्य केंद्र म्हणजे रेलेश्वर मंदिर, जे शंकर-पार्वतीच्या मूर्तींसह प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे.

या मंदिराचा दोन वेळा जिर्णोद्धारही करण्यात आला आहे.

महादेव-पार्वतीच्या विवाहाचे हे प्रतीकात्मक रूप आदिवासी समाजासाठी श्रद्धा,

एकता आणि सांस्कृतिक जतनाचे प्रतीक ठरले आहे.

संस्थेचे अध्यक्ष सुधाकर घुगरे यांची माहिती

या कार्यक्रमाचे आयोजन रेलेश्वर संस्थान आणि स्थानिक समिती करत असून,

संस्थेचे अध्यक्ष सुधाकर घुगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाही हा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे.

Related News