सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने 2024-25 या आर्थिक वर्षात 133 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे.
जो मागील वर्षीच्या 114 कोटी रुपयांपेक्षा 14% जास्त आहे.
31 मार्च रोजी वार्षिक अर्थसंकल्प सादरीकरणा दरम्यान ट्रस्टच्या कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी ही घोषणा केली आहे.
Related News
नांदेड मध्ये एका ट्रॅक्टरचा विचित्र प्रकारे अपघात, 6 ते 7 मजुरांचा मृत्यू
“१० लाख भरल्याशिवाय उपचार नाही”, गर्भवतीचा मृत्यू; पुण्यात संतापाची लाट
ईद साजरी करताना गंगा-जमूनी संस्कृतीचे दर्शन शिरखुर्मा वाटप करून सुधाकरराव नाईक शिक्षण संस्थांमध्ये ईद उत्सव उत्साहात
शेतकरी फार्मर आयडीसाठी दिंडी व विशेष शिबिराचे आयोजन
धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन युवकाची आत्महत्या;
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! 90,000 पार; पण लवकरच मोठी घसरण येणार?
शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या घेऱ्यात मुख्यालयाचा वाद !
सलमान खान भावूक: ‘सिकंदर’साठी सहकलाकारांकडून समर्थनाचा अभाव
खासदार बळवंतभाऊ वानखडे यांची लोकसभेत जोरदार मागणी…..
रस्त्यांच्या समस्येवर उपाय – ग्रामशेतरस्ता समितीच्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांची जोरदार मागणी
चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाई
आठवपैल: एका आठवणीच्या किनाऱ्यावर
महसूल वाढ :
भक्तांच्या देणग्या (ऑनलाइन आणि ऑफलाइन)
पूजा विधी व प्रसाद विक्री (लाडू, नारळ वडी)
सोने-चांदीच्या वाहिल्यामुळे वाढल्या जाणारे उत्पन्न
सिद्धिविनायक मंदिरच्या ट्रस्ट कडून भाग्यलक्ष्मी योजना – मुलींसाठी विशेष एफडी योजना
मंदिर ट्रस्टने वाढत्या महसुलाच्या पार्श्वभूमीवर “सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना” सुरू केली .
- मुलींच्या शिक्षण आणि कल्याणाला चालना देणे.
- ही एक FD (Fixed Deposit) योजना असून, गरजू मुलींना आर्थिक मदत देण्याचे उद्दिष्ट आहे.
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या या समाजोपयोगी उपक्रमामुळे गरजू मुलींना शिक्षण
आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
मुलींच्या हितासाठी सिद्धिविनायक एफडी योजना
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने ‘सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’
नावाचा एक नवा उपक्रम प्रस्तावित केला आहे.
महिला आणि मुलींच्या कल्याणाला चालना देण्याच्या उद्देशाने या योजनेची घोषणा करण्यात आली आहे.
योजनेची वैशिष्ट्ये:
महिला दिनी (8 मार्च) नागरी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक मुलीसाठी ₹10,000 ची फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) करण्यात येणार आहे.
ही एफडी मुलीच्या आईच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
हा उपक्रम ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेशी सुसंगत असल्याचे ट्रस्टचे उपकार्यकारी अधिकारी संदीप राठोड यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकारकडे या योजनेच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
पहिल्यांदाच कोणत्याही मंदिर ट्रस्टने अशा प्रकारचा उपक्रम राबवण्याची घोषणा केली आहे,
त्यामुळे हा एक ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे. या योजनेमुळे नवजात मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक
सुरक्षेची पायाभरणी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.