पुण्यात एका पतीने आपल्या पत्नीला मूल व्हावे म्हणून आपल्या मित्राला तिच्यासोबत शरीरसंबंध
ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पत्नीने पती आणि त्याच्या मित्राविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.
Related News
बच्चन सिंग यांची नागपूर कमांडर म्हणून बदली; आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदल
अकोला (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून राज्यभरातील पोलीस अधीक्षकांच्या
...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी): काल झालेल्या जोरदार पावसामुळे डाबकी रोड परिसरात
वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पावसाच्या तीव्रतेमुळे रस्ते जलमय झाले असून,
सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरण...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी): इयत्ता दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील
कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया जोमात सुरू झाली आहे.
१९ मेपासून सुरू झाले...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून अकोल्यातील पातुर, बाळापूर तालुक्यांसह इतर
भागांमध्ये सतत घिरट्या घालणाऱ्या विमानामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती.
...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी): अकोला शहरात गेल्या एक तासापासून प्री-मान्सून पावसाने जोर धरला
असून शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र आहे.
काही ठिकाणी रस्त्यांवर जलजमाव झाल्याने वाह...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी): अकोल्याच्या अकोट फाईल परिसरातील पूरपीडित इंदिरानगरमध्ये
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात
आल्याची धक्कादायक घटना समोर आली...
Continue reading
अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच असून अनेक ठिकाणी
आलेल्या पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. तर आगामी खरीप हंगामाची तयारीही खोळंबली आहे.
अकोल्यातील गोर...
Continue reading
नवी दिल्ली (प्रतिनिधी) – पाकिस्तानसाठी जासूसी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात
आलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रा उर्फ ‘ज्योती राणी’ या प्रकरणात एक नवा खुलासा समो...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी) – लग्नसमारंभ म्हटले की विविध आकर्षक कार्यक्रम,
आधुनिक ट्रेंड्स हे सामान्य झाले असताना अकोल्यात एका विवाहसोहळ्याने सामाजिक व धार्मिक
जाणीवेचा नवा आदर्श निर्माण क...
Continue reading
अकोला : शहरातील अकोट फैल येथील अब्दुल कलाम चौकाजवळील गौसिया मशिदीच्या गल्ली
परिसरात सोमवारी (२१ मे) संध्याकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या अवकाळी
पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण...
Continue reading
बार्शीटाकळी (अकोला) : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या अवकाळी
पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील मांगुळ येथील अल्पभूधारक शेतकरी रमेश काकड यांच...
Continue reading
अकोला | पातुर : पातुर येथील बजरंग सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोवंश जातीच्या जनावरांची अवैध
तस्करी रोखत एक मोठी कारवाई केली आहे. हैदराबादला कत्तलीसाठी घेऊन जात
असलेला एक ट्रक त्...
Continue reading
गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
त्यातच आता पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुण्यातील एका पतीने पत्नीला मूल व्हावे आणि आपले पौरुषत्व जगाला दिसावे यासाठी
मित्रालाच पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी घरी बोलावल्याचा आरोप पत्नीने केला आहे.
पतीच्या मित्राने पत्नीला फोन करून सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
याप्रकरणी पत्नीने पती आणि त्याच्या मित्राविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पुण्यातील असून तिचा पती सांगलीचा आहे.
सध्या तो पुण्यातच स्थायिक आहे. महिलेने तक्रारीत नमूद केल्याप्रकरणी सांगलीत
नांदत असताना तिचे पतीसोबत वारंवार खटके उडत होते. यामुळे तो तिला मारहाण करत होता.
या कारणामुळे सहा महिन्यांपूर्वी ती माहेरी निघून गेली होती. जुलै २०२३ मध्ये जेव्हा ती आणि तिचा
पती एकत्र राहत होते, तेव्हा पती त्याच्या एका मित्राला घरी घेऊन आला होता.
त्यावेळी पतीचा मित्र तिच्याकडे वाईट नजरेने बघत होता, असे तिने पतीला सांगितले.
यावरून पतीने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर ती माहेरी निघून आली. या घटनेनंतर,
१७ फेब्रुवारी २०२५ पासून पतीचा तो मित्र महिलेला वारंवार मेसेज करत होता.
त्याच्या वारंवार येणाऱ्या मेसेजकडे तिने दुर्लक्ष केले. मात्र, १ मार्चला त्या मित्राने तिला फोन केला आणि धक्कादायक माहिती दिली.
त्याने त्या महिलेला सांगितले की, तुझ्या पतीने मला तुझ्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी सांगितले होते.
तुझ्या पतीचा लैंगिक समस्या आहेत, असेही त्याने तिला सांगितले. तुझा पती नपुंसक असल्याने
आणि तिला मूलबाळ व्हावे या उद्देशानेच त्याने मला तुझ्यासोबत शरीरसंबंधासाठी पाठवले होते,
असे तिच्या पतीच्या मित्राने सांगितले.
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
या धक्कादायक खुलासामुळे त्या महिलेला धक्का बसला. तिने तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
याप्रकरणी पती आणि त्याच्या मित्राविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली.
सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.