Jitendra Awhad : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाडवा मेळावा काल भव्यतेत पार पडला.
राज ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं.
खरंतर मनसेचा हा गुढी पाडवा मेळावा आणि शरद पवार यांच्या पक्षाचा तसा काही संबंध नाही.
Related News
देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचं चित्र दिसत असून, आज (२१ मे) दुपारी १
वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतात एकूण २५७ कोरोना रुग्ण आढळले आहेत.
मुंबई, चेन्नई आणि ...
Continue reading
मुंबई : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. काही काळासाठी घसरणीनंतर पुन्हा एकदा
सोने महागले असून, आज 21 मे रोजी देशभरातील अनेक शहरांमध्ये सोने दर वाढले आहेत.
24 कॅरेट ...
Continue reading
हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिने आपल्या कबुली जबाबात पाकिस्तानच्या
सूचनेनुसार काम केल्याचं मान्य केलं आहे.
देशविरोधी कारवायांमध्ये तिचा थेट सहभाग होता, अशी धक्कादायक मा...
Continue reading
रत्नागिरी : राज्यात परत एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून कोकणात दरड कोसळण्याच्या
घटनांमुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
विशेषतः वेरवली-विलवडे स्टेशनदरम्यान दरड कोस...
Continue reading
देहरादून : उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. डोंगराळ
भागांपासून मैदानांपर्यंत जोरदार पावसाची आणि वेगवान वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान वि...
Continue reading
मुंबई : राज्यात प्री-मान्सून पावसाने जोरदार एंट्री घेतली असून हवामान विभागाने आज (21 मे) 22
जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
कोकण, घाटमाथा आणि मराठवा...
Continue reading
नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जून अखेरीस शेतकऱ्यांच्या
खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, या योजनेचा लाभ वेळेत मिळवायचा असे...
Continue reading
अकोला : आयपीएल 2025 च्या प्लेऑफ शर्यतीत निर्णायक वळण आले असतानाच,
आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अत्यंत
महत्त्वाचा सामना रंगणार आहे. मात...
Continue reading
अकोल्यातील न्यू तापडिया नगर, खरप, पाचपिंपळ, घुसर, आपातापा आदी ग्रामीण
भागात येण्या जाण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूलाचे काम सध्या सुरू आहे.
मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाच...
Continue reading
खारघर :
खारघर : मनःशक्तिकेंद्र खारघर आयोजित संस्कार वर्गाच्या माध्यमातून श्रेयाताई प्रभुणे यांनी १२
विद्यार्थ्यांच्या टिमसह कपिलाश्रम गोशाळेत एक तासाचा "गोमाता सेवा व परिचय वर्...
Continue reading
अकोला : आगर येथील प्रदीप गव्हाळे यांचा चार वर्षांचा एकुलता एक मुलगा तुषार सकाळी घरातून
खेळायला बाहेर गेला होता. मात्र, सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी गावात शोधाशोध स...
Continue reading
अकोल्याच्या बार्शीटाकळी रोडवर शिवापुर फाट्याजवळ मंगळवारी संध्याकाळी एका दुचाकीचा
भीषण अपघात घडला. क्रशर प्लांटवरून परत येताना दुचाकीवरील चालकाचा ताबा
सुटला आणि दुचाकी थेट रस्...
Continue reading
पण शरद पवार यांच्या पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
हे आभार का मानले आहेत? ते जाणून घ्या.
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दादरच्या शिवाजी पार्क मैदानात भव्य मेळावा पार पडला.
राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने मनसैनिक आले होते.
यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात गाजत असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावर भाष्य केले.
महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर हटवावी, अशी भूमिका काही पक्षांनी घेतली आहे.
राज ठाकरे यांनी बिलकुल त्या उलट भूमिका घेतली. औरंगजेबाची कबर का हटवू नये?
त्यामागचा विचार राज ठाकरे यांनी सभेत बोलून दाखवला. “१६८१ ते १७०७ म्हणजे २७ वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात लढत होता.
संभाजी राजांबरोबर लढला. त्यांना क्रूर पद्धतीने मारले. राजाराम महाराज, संताजी धनाजी, ताराराणी साहेब लढल्या.
औरंगजेब एकही लढाई जिंकू शकत नव्हता. त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता.
पण जमले नाही. सर्व प्रयत्न केले आणि तो मेला” असं राज ठाकरे म्हणाले.
“जगाच्या इतिहासात औरंगजेब वाचला जातो. जगभरातील लोकांना कळते तो काय करायला गेला होता आणि कसा मेला.
तिथे शिवाजी महाराजांचे नाव येते. आता औरंगजेबची ती सजवलेली कबर काढा. त्या ठिकाणी नुसती कबर दिसली पाहिजे.
त्या ठिकाणी मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवयाला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला…” असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला.
“औरंगजेब हा आमचा इतिहास आहे. इतिहास कशासाठी वाचायचा. इतिहासातून बोध घेण्यासाठी वाचायचा.
मराठ्यांनी ज्यांना गाडले त्याची प्रतिके नष्ट करून चालणार नाही.
जगाला कळले पाहिजे आपण त्यांना गाडले” असे राज ठाकरे यांनी म्हटले.
राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी X वर पोस्ट करुन राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी का आभार मानले?
“मी जे औरंगजेब/अफझलखाना बद्दल बोल्लो होतो, तेच आज राज ठाकरे बोलले ..
आभार. महाराजांचा इतिहास पुसू देणार नाही” असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलय.
“काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून अतिशय योग्य भूमिका
मांडली तीच भूमिका मी विधानसभेत मांडली होती” असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे