पोलीस स्टेशनमध्ये बुधवार दिनांक २६ मार्चरोजी रात्री ९.३०ते१० वाजे दरम्यान बिलाचे पैशाचे
कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याने पोलीस स्टेशन आवारात वाद विकोपाला गेल्याने झटापट झाली.
अशा आशयाची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक संजय वाघ यांनी दिली.फिर्यादीवरून आरोपी
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
नितीन वसंतराव गायकी, अविनाश वसंतराव गायकी, क्रिष्णा रवी गायकी, ताराचंद रामलाल पालीवाल,
आशिष ताराचंद पालीवाल, डॉ. अनिल मल्ल, अनुप ताराचंद पालीवाल सर्व राहणार तेल्हारा अशा ७ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी डे- नाईट ऑफिसर ड्युटी करत असताना २६ मार्च रोजी तक्रारदार ताराचंद रामलाल पालीवाल(५८)
रा. तहसीलरोड तेल्हारा व परस्पर विरोधी तक्रारदार नितीन वसंतराव गायकी (३८) साईमंदिर तेल्हारा दोघामध्ये
बिलाचे पैशाचे कारणावरून वाद झाल्याने दोन्ही तक्रारदार पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट देणे करिता आले
असता गावातील प्रतिष्ठित लोकांनी पोलीस स्टेशन येथे येऊन त्यांचेतील वाद मिटवून दोन्ही तक्रारदारांनी
आपसी समझौतानामा झाल्याने दोन्ही तक्रारदार हे तक्रार न देता पोलीस स्टेशन मधून निघून गेले.
त्यानंतर रात्री९.३० वाजता फिर्यादी संजय वाघ पोलीस स्टेशनला दैनंदिन काम करीत असताना ताराचंद पालीवाल,
अनुप पालीवाल, आशिष पालीवाल, डॉ.मल्ल हे पोस्टे आवारामध्ये आले व सकाळचे वादाचे कारणावरून बोलचाल करून वाद घालू लागले.
त्यावादात त्यांनी एकमेकांसोबत झटापट करीत , एकमेकांना मारहाण केली .
म्हणून पोस्टेतील हजर अधिकारी, पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले, भटकर, पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे,
पोलीस कर्मचारी यांनी तो वाद सोडविला.त्यानंतर आरोपी पोस्टे मधून न सांगता परस्पर निघून
गेल्यानंतर आरोपींचे कृत्य भारतीय न्याय संहिता (बी एन एस)२०२३ चे कलम १९४(२) प्रमाणे होत
असल्याने त्यांचे विरुद्ध कायदेशीर तक्रार तेल्हारा पोस्टे मध्ये नोंदविण्यात आली आहे.
व गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तेल्हारा पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.