Dhananjay Munde & Chhagan Bhujbal : विधिमंडळ समित्यांमध्ये धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना राष्ट्रवादीकडून कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही.
Dhananjay Munde & Chhagan Bhujbal : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच सरकारकडून विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
मात्र, या समितीत वादग्रस्त राहिलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Faction) माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)
Related News
“१० लाख भरल्याशिवाय उपचार नाही”, गर्भवतीचा मृत्यू; पुण्यात संतापाची लाट
ईद साजरी करताना गंगा-जमूनी संस्कृतीचे दर्शन शिरखुर्मा वाटप करून सुधाकरराव नाईक शिक्षण संस्थांमध्ये ईद उत्सव उत्साहात
शेतकरी फार्मर आयडीसाठी दिंडी व विशेष शिबिराचे आयोजन
धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन युवकाची आत्महत्या;
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! 90,000 पार; पण लवकरच मोठी घसरण येणार?
शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या घेऱ्यात मुख्यालयाचा वाद !
सलमान खान भावूक: ‘सिकंदर’साठी सहकलाकारांकडून समर्थनाचा अभाव
खासदार बळवंतभाऊ वानखडे यांची लोकसभेत जोरदार मागणी…..
रस्त्यांच्या समस्येवर उपाय – ग्रामशेतरस्ता समितीच्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांची जोरदार मागणी
चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाई
आठवपैल: एका आठवणीच्या किनाऱ्यावर
सातपुड्याच्या पायथ्याशी हिंस्र वन्यप्राण्यांचा वावर; शेतकऱ्यांची दहशत
आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना राष्ट्रवादीकडून कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने वेगवेगळ्या आमदारांना वेगवेगळ्या समितीत घेण्यात आले आहे.
मात्र माजी मंत्री असलेले धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना कुठेच कोणत्याही समिती स्थान दिले गेले नाही.
अजित पवार यांनी जाणीवपूर्वक वादग्रस्त असलेले धनंजय मुंडे यांना समितीत स्थान न देता चार हात लांब ठेवल्याची जोरदार चर्चा आहे.
मुंडेंचं खातं अजितदादांनी स्वतःकडेच ठेवल्याने भुजबळ नाराज?
दुसरीकडे, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेले मंत्रिपद देखील अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवल्याने छगन भुजबळांची नाराजी वाढत असल्याची माहिती मिळत आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या मंत्रिपदावर भुजबळांची वर्णी लागेल, अशी जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचं खातं स्वतःकडेच ठेवले आहे.
पक्षाचा ओबीसी चेहरा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भुजबळांना मंत्रिपदापासून लांब ठेवल्याने कार्यकर्त्यांनामध्ये नाराजी पसरल्याचे पाहायला मिळत आहे.
छगन भुजबळ यांनी नाराजी अजित पवार कशी दूर करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.